Breaking News

मुंबई – नवी मुंबई

राज्यातील 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

मुंबई ः प्रतिनिधी राज्य शासनाने अनलॉकसंबंधीची नवी नियमावली सोमवारी (दि. 2) जारी केली. यामध्ये 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यानुसार या जिल्ह्यांना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला असून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र लेवल-3चे नियम कायम …

Read More »

पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मुंबई ः प्रतिनिधी ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तविलाय. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो, मात्र यंदा राज्यासह देशात पुढील दोन महिन्यांचा विचार केला तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहिल, असे …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती. गेला …

Read More »

नवी मुंबईत वाढवल्या कोरोना चाचण्या

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी उपाययोजना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन  प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल दोन …

Read More »

सोनू सूद करणार भारताचे नेतृत्व; विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई ः प्रतिनिधी गरीब, त्रासलेल्या आणि गरजूंना मदत करणारा बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने अलीकडेच आपला 48वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त, जवळचे मित्र आणि बॉलीवूड स्टार्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह सोनूला त्याच्या वाढदिवशी विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर …

Read More »

पूर-दरडग्रस्तांना मदत करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात पूर आणि दरड दुर्घटनांमुळे मोठी हानी झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त 26 ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आणि आपद्ग्रस्तांसोबत चर्चाही केली. यानंतर त्यांनी ठाकरे सरकारकडे काही मागण्या केल्या आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 25 जुलै रोजी कोकण आणि 28 …

Read More »

पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भाजपकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागांतून 20 ते 25 ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागांत पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी …

Read More »

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध होणार शिथिल

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोना  रुग्णसंख्येचे प्रमाण घटत असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार 25 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील रुग्णवाढीचा दर कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा …

Read More »

राज म्हणाला शिल्पासोबत माझे संबंध ठीक नाही -शर्लिन चोप्रा

मुंबई : प्रतिनिधी पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत अभिनेत्री शर्लिन चोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे. राज कुंद्रा मला किस करत म्हणाला की शिल्पासोबत माझे संबंध ठीक नाहीत, असा दावा शर्लिनने तिचा जबाब नोंदविताना केला . शर्लिनला मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी …

Read More »

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे …

Read More »