पहिलाच दिवस ठरला वादळीभाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन; सत्ताधार्यांकडून दडपशाही मुंबई ः प्रतिनिधीविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि. 5) पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ उडाला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा समाचार घेतला. अन्यायी कारभारावरून भाजपने सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडले. या वेळी जनतेच्या हिताच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर …
Read More »आजपासून अधिवेशनाची रणधुमाळी; ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले -फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत सोमवार (दि. 5)पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र हे अधिवेशन दोनच दिवसांचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली …
Read More »मराठा समाज झुकणार नाही -चंद्रकांत पाटील; राज्य सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध
मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली. त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, असा इशारा भाजप …
Read More »ईडीचे कारवाईसत्र सुरूच; अभिनेता डिनो मोरियासह चौघांची संपत्ती जप्त
मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. डिनोची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. डिनोसोबतच डीजे अकील बच्चुअली, अभिनेता संजय खान आणि इरफान सिद्दीकी यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. या चौघांवर पैशांच्या अफरातफरीचा (मनी लॉण्ड्रिंग) आरोप …
Read More »नवी मुंबईतही बोगस लसीकरण
नवी मुंबई ः प्रतिनिधीकोरोना प्रतिबंधक बोगस लस प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. आता नवी मुंबईतही एप्रिलमध्ये झालेल्या एका लसीकरण शिबिरात बनावट लस दिली गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. मनीष त्रिपाठी व करीम अशी दोन आरोपींची नावे असून तिसर्या आरोपीचे नाव …
Read More »नवी मुंबईतील रुग्णसंख्या वाढवतेय चिंता; दैनंदिन आकडेवारीत कोरोनाबाधित शंभरच्या वर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होताच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधितांचा आलेख पुन्हा चढणीला लागला आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांत उच्चांकी पातळीवर गेलेला रुग्णवाढीचा आलेख जूनच्या पहिल्या आठवड्यात खाली आल्यानंतर नंतरच्या तीन आठवड्यांत तो वाढत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात …
Read More »मराठा आरक्षण : आधी राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्ण करावी -पाटील
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे असे समजून राज्य सरकारने स्वस्थ बसू नये. केंद्र सरकारकडून ती जबाबदारी पूर्ण होण्यासाठी आधी जे आवश्यक टप्पे राज्य सरकारने पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तातडीने काम करावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.पाटील …
Read More »‘पावसाळी अधिवेशनावेळी विविध मागण्यांसाठी निदर्शने करणार’
मुंबई : प्रतिनिधी पदोन्नतीमधील आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी येत्या 6 जुलै रोजी आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष …
Read More »महाविकास आघाडीत विसंवाद -दरेकर
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याने संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाभारताचे दाखले द्यावे लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूसफूस, विसंवाद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आघाडी करण्यामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. आता …
Read More »विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी भाजपचे गणेश भगत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनातून केली आहे. नेरूळ नोडमधील प्रभाग 96 मध्ये सेक्टर 16 परिसरात सनहोम या गृहनिर्माण सोसायटीलगत आणि सनशाईन …
Read More »