11-12 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह आसपासच्या महानगरातील लोक लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण होणार असून, या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक …
Read More »ठाकरे सरकार पळ काढतेय : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीराज्यात शेतकर्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचे वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती, मात्र राज्य सरकारने ती अमान्य करीत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढतेय, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री …
Read More »नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत आता घट होत असल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे. ही घट दिलासादायक असली तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असले तरी नियमांचे पालन व काळजी घेणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपूर्वी 19.23 वर असलेला कोरोनाबाधित होण्याचा दर आता …
Read More »विवाह सोहळ्यांवरही कोरोनाचे सावट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तविल्या जात असल्याने याचा परिणाम दिवाळीनंतर होणार्या लग्न समारंभावर झालेला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले …
Read More »यूपीत नवी फिल्मसिटी उभारणार : सीएम योगी
मुंबई : प्रतिनिधीउत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचे काम आम्ही करीत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधीकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिल, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आदित्यनाथ यांनी शिवसेनेकडून झालेल्या टीकेवर बोलताना स्पष्ट …
Read More »नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनेल
आमदार गणेश नाईक यांचा विश्वास; स्वच्छता, वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ नवी मुंबई ः बातमीदार नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांनी कृतिशील संकल्प केल्यास नवी मुंबई शहर स्वच्छ भारत अभियानात नक्कीच प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला. भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ग्रीन होप, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट …
Read More »सिडको मलनिस्सारण केंद्रातून पुनर्प्रक्रिया केलेले पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन प्रस्तावित
पिण्यायोग्य पाण्याची होणार बचत नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबईतील कळंबोली येथील नियोजित मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्रातून 30 दशलक्ष लिटर पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविण्याचे नियोजन सिडकोतर्फे प्रस्तावित आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात पिण्यायोग्य अशा स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. सिडकोचे कळंबोली येथे 50 द. ल. लिटर क्षमतेचे मलनिस्सारण …
Read More »पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान
मुंबई : प्रतिनिधीराज्य विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांमध्ये मंगळवारी (दि. 1) मतदान प्रक्रिया शांततेत झाली. यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक या जागांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानावर परिणाम दिसून आला.या निवडणुकीनंतर राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी …
Read More »…हे तर शिवसेनतील महिला कार्यकर्त्यांचे अवमूल्यन!
उर्मिलांच्या पक्षप्रवेश वक्तव्यावर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीकोणाला पक्षात प्रवेश द्यायचा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे, मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असे म्हणणे म्हणजे बाळासाहेबांनी ज्या महिला कार्यकर्त्यांना रणरागिणी अशी उपमा दिली, त्या लढवय्या कार्यकर्त्यांचे अवमूल्यन करण्यासारखे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते …
Read More »डॉ. सतीश वैरागी यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधी कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यामार्फत दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार दादासाहेब फाळके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किल्ल्याणजी यांच्या हस्ते मुंबई अंधेरी येथे देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणारे तसेच कोविडमध्ये जिवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सतत कार्यरत असणार्या व्यक्तींना हा …
Read More »