नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 4 ते 13 जुलै दरम्यान संपूर्ण नवी मुंबई मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी एपीएमसी मार्केट सुरू ठेवले जाणार आहे. नवी मुंबई मधील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या …
Read More »मुंबईत 15 जुलैपर्यंत जमावबंदी
मुंबई : प्रतिनिधीदेशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून 15 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. दरम्यान, सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांनाच बाहेर …
Read More »कासाडी नदी प्रदूषणाची अधिकार्यांकडून पाहणी
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीत सोमवारी (दि. 29) पहाटे विघातक विषारी पाणी सोडल्याने कानपोली पुलाखाली पाण्याला लाल रंग आला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दुसर्याच दिवशी पाहणी केली, मात्र संबंधित रसायन हे कानपोली पुलाच्या खाली असल्याने ते क्षेत्र …
Read More »आधार फाऊंडेशनचे गोरगरिबांसाठी अन्नछत्र; 40 हजार नागरिकांना अन्नदान
कळंबोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. त्यामुळे रोजंदारी, नाका कामगारांची रोजीरोटी बंद झाली. निराधार महिलांची कामे गेली. व्यवसाय ठप्प झाले तसेच अनेकांच्या नोकर्या गेल्या. हातावर पोट असलेल्यांना पोट कसे भरायचे याची चिंता लागली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या परिस्थितीत गरीब-गरजू उपाशी राहू नयेत म्हणून …
Read More »खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वचक; महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची होणार अंमलबजावणी
नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना सुलभरीत्या उपचार मिळावा या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने समिती गठीत केली आहे. ही समिती खासगी रुग्णालयांचे उपचाराचे दर निश्चित करणार आहे. राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी …
Read More »राज्यात लॉकडाऊन कायम
31 जुलैपर्यंत निर्बंध लागू राहणार मुंबई : प्रतिनिधीराज्यात ’मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महिनाभर लॉकडाऊन कायम राहणार असून, सध्या आहे तेच नियम लागू असतील. यात शिथिलता देण्यात आलेली नाही. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. 1 …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांमार्फत ऑनलाईन शंकांचे निरसन
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक चिंतेत आहेत. त्यात केंद्र शासनाच्या सतत बदलणार्या विविध नियमांचव पालिकेला अंमलबजावणी करावी लागत आहे. या नव्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांचे शंका निरसन व्हावे या उद्दिष्टानुसार थेट वैद्यकीय अधिकार्यांनीच नागरिकांचे ऑनलाइन शंकानिरसन केले. स्थानिक माजी नगरसेवक …
Read More »भारत रक्षा मंचची दशकपूर्ती खारघर येथे उत्साहात साजरी
खारघर : रामप्रहर वृत्त भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शनिवारी (दि. 27) साजरा करण्यात आला. मंचची स्थापना सन 2010मध्ये भोपाळ येथे केली गेली होती. ’बांगलादेशी घुसखोरी : देशावरील मोठे संकट’ या परिचर्चेतून सूर्यकांत केळकर यांनी संघटनेची स्थापना केली व आज देशातील …
Read More »सेना भवनाला कोरोनाचा विळखा; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर कोरोना पोहचल्यानंतर आता सेना भवनालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणार्या काही कर्मचार्यांना कोरोनाची …
Read More »भविष्यात मुंबई, पुण्यातील गर्दी कमी करणे आवश्यक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत मुंबई : प्रतिनिधीभविष्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई, पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper