मुंबई ः प्रतिनिधी पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली. …
Read More »‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी ठरला जगज्जेता
जागतिक पोलीस अॅण्ड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू, तीन वेळा ’महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस अॅण्ड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत …
Read More »इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश
मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडून आढावा अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. खालापूर येथे इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा …
Read More »एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार
मुंबई : प्रतिनिधी नैसर्गिक आपत्तीत असणार्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा एनडीआरएफचा बेस कॅम्प याच जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्याकरिता आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »करंजाडे येथे विविध विकासकामे
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 23) करंजाडे येथे झाला. या विकासकामांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकासकामांचा शुभारंभांमध्ये …
Read More »तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी …
Read More »एक होती इर्शाळवाडी!
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत आता उरल्यात कटू आठवणी… मुसळधार पावसात अंधार्या रात्री या आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरांसह आतील माणसे ढिगार्याखाली गाडली गेली… काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले…! मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळील इर्शाळवाडी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाशझोतात आली आहे. गेल्या चार दिवसांत अनेकांची पावले तिकडे वळली, पण इर्शाळगडावर …
Read More »संयमी, संतुलित नेतृत्व..!
अनेक कारणांमुळे देवेंद्र आणि माझ्यात एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे. देवेंद्रच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याकडे येणार्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. दिलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडण्याचा त्याचा स्वभाव आहे. जितका आज्ञाधारक, तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे. संयमी, आज्ञाधारक, तितकाच …
Read More »पनवेल व उरण येथे 25 जुलैला होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त कोणत्याही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत …
Read More »खारघरमधून चार लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत;
दोन नायजेरियन व्यक्तींना अटक पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4 लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथे दोन विदेशी नागरिक अमली पदार्थ घेऊन …
Read More »