Breaking News

मुंबई – नवी मुंबई

करंजाडे येथे विविध विकासकामे

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 23) करंजाडे येथे झाला. या विकासकामांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकासकामांचा शुभारंभांमध्ये …

Read More »

तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी …

Read More »

एक होती इर्शाळवाडी!

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत आता उरल्यात कटू आठवणी… मुसळधार पावसात अंधार्‍या रात्री या आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरांसह आतील माणसे ढिगार्‍याखाली गाडली गेली… काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले…! मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळील इर्शाळवाडी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाशझोतात आली आहे. गेल्या चार दिवसांत अनेकांची पावले तिकडे वळली, पण इर्शाळगडावर …

Read More »

संयमी, संतुलित नेतृत्व..!

अनेक कारणांमुळे देवेंद्र आणि माझ्यात एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे. देवेंद्रच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. दिलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडण्याचा त्याचा स्वभाव आहे. जितका आज्ञाधारक, तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे. संयमी, आज्ञाधारक, तितकाच …

Read More »

पनवेल व उरण येथे 25 जुलैला होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त कोणत्याही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत …

Read More »

खारघरमधून चार लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत;

दोन नायजेरियन व्यक्तींना अटक पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4 लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथे दोन विदेशी नागरिक अमली पदार्थ घेऊन …

Read More »

नवी मुंबईत पावसाचे धुमशान

नवी मुंबई : बातमीदार राज्याच्या हवामान खात्याने पुढील पाच दिवसा अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. पावसानेदेखील कोकण पट्ट्याला आपला तडाखा दिला आहे. सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईतदेखील पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. नवी मुंबईत मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला. या कोसळधारेने नवी मुंबईकर मात्र चिंब …

Read More »

विस्मृतीत गेलेली रामदास बोट दुर्घटना

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जलवाहतुकीच्या इतिहासातील एक सर्वोच्च दुर्घटना म्हणून उल्लेखलेल्या तसेच या दुर्घटनेने अलिबाग, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, पोलादपूर, दापोली, वेंगुर्ला, रत्नागिरी तसेच परळगाव, लालबाग, गिरणगाव आणि गिरगाव येथील कोकणवासीयांच्या व मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणार्‍या रामदास बोटीच्या जलसमाधीस 17 जुलै 2023 रोजी बरोबर 76 वर्षे होत आहेत. रेवस …

Read More »

कामोठ्यात भाजपची टिफिन बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 16) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे येथे …

Read More »

बैलांना धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

अन्य दोघेही जखमी महाड : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरा नाजिक सुंदरवाडी येथे दुचाकीस्वाराची रस्त्यावर आलेल्या दोन बैलांना धडक बसल्याने दुचाकी वरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. 15 जुलैला रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असुन, प्रेम मुकेश पवार (वय 18, रा. स्वारगेट, …

Read More »