अलिबाग ः प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके व स्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यास मान्यता दिली आहे. महाड तालुक्यातील अचलोल येथील सोनगड (सोनगिरी), अलिबाग तालुक्यातील आगरकोट येथील कॅथेड्रल, चौकोनी किल्ला …
Read More »पांढर्या कांद्याला मानांकन मिळाले, पुढे काय?
अलिबागच्या प्रसिद्ध पांढर्या कांद्याला केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या कांद्याला आता वेगळी ओळख मिळेल. अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कांद्याला देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे. या मानांकनामुळे पांढर्या कांद्याला वेगळी ओळख मिळेल, हे खरं आहे. परंतु शेतकर्यांना त्याचा फायदा काय. मानांकन …
Read More »मुरूडमधील टपरीधारकांना शासनाने सोडले वार्यावर
मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याची शासन दरबारी नोंद होऊन वर्ष उलटून गेले, तरी कुठलीही मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट असणार्या लोकांमध्ये नाराजी व संताप निर्माण झाला आहे. मुरूड समुद्रकिनारी वडापाव, चायनिज, नारळ पाणी, स्नॅक्स सेंटर, भेळपुरी, पाणीपुरी व अन्य …
Read More »कर्जत पालिकेचे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन एक वर्षानंतर दिसले रस्त्यावर
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषदेने आरोग्य विभागासाठी एक वर्षापूर्वी रोड व्हॅक्युम स्विपर मशीन घेतले होते. तिचे लोकार्पणही झाले, मात्र ती रस्त्यावर कधीच दिसली नव्हती. तब्बल एक वर्षांनंतर ही मशीन बुधवारी (दि. 13) कर्जत शहरातील रस्ते साफ करताना दिसले. कर्जत नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. हे रस्ते स्वच्छ …
Read More »विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये सफाई कामगारांचा सन्मान
महाड : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमधील सफाई कामगारांचा भाजपकडून सन्मान करण्यात आला. महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी महाप्रलय आला होता. त्यानंतर संपूर्ण शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाड शहर स्वच्छ केले …
Read More »अलिबागमध्ये ऑनलाईन फसवणूक
महिलेला दीड लाखाचा गंडा अलिबाग : प्रतिनिधी अलिबागमध्ये ऑनलाइन मद्य खरेदीत एका महिलेची दीड लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अलिबागमधील एका महिलेच्या कुटुंबात लग्न ठरले होते. लग्न सोहळ्यातील हळदी समारंभास येणार्या पाहुण्यांसाठी मद्याची व्यवस्था करायची होती. त्यासाठी महिलेने पीके वाईन्स …
Read More »मद्याची अवैध वाहतूक करणारे जेरबंद
पेणजवळ ट्रकसह 82 लाखांचा मुद्देमाल जप्त अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्या त्रिकुटाला अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रकसह 82 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवा राज्यातून मुंबईकडे टाटा कंपनीच्या ट्रकमधून (एमएच 06-एक्यू 5846) बनावट …
Read More »अनोखे सीमोल्लंघन
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे पूर्वीपासून म्हटले जाते. परंतु गेली दोन वर्षे हा आनंदच हरपला होता. आता तो परत मिळवायचा आहे. याच दिवशी पांडवांनी अश्मंतक वृक्षाच्या ढोलीत लपवलेली शस्त्रास्त्रे बाहेर काढून आपला अज्ञातवास संपवला होता अशी कथा महाभारतात सांगितली आहे. विराटाघरचा पाहुणचार संपवून पंच पांडव पुन्हा एकदा राजकर्तव्याला …
Read More »न्हावेे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरिश्चंद्र म्हात्रे विराजमान
उरण : प्रतिनिधी न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे हरिश्चंद्र म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच म्हात्रे यांचे अभिनंदन केले. न्हावे ग्रामपंचायतीमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस …
Read More »पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘गती शक्ती’चा शुभारंभ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 13) नवी दिल्ली येथे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती राष्ट्रीय महायोजनेचा प्रारंभ केला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील नवीन प्रदर्शन संकुलाचे उद्घाटनही त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, हरदीपसिंग पुरी, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव, आर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper