मुंबई : प्रतिनिधीराज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे, परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी …
Read More »महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? -राज ठाकरे
नाशिक : प्रतिनिधीराज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर तोंडसुख घेतले आहे. राज ठाकरे सध्या नाशिक …
Read More »राष्ट्रवादीचे विशाल म्हात्रे सहकार्यांसह भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उलवे नोड अध्यक्ष विशाल म्हात्रे यांनी आपल्या सहकार्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये गुरुवारी (दि. 23) जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल घालून पक्षात स्वागत केले. या वेळी लोकनेते …
Read More »क्रिकेट दौरे रद्द झाल्याने इम्रान खान खवळले
इस्लामाबाद : वृत्तसंस्था न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्तब्ध झाले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -20 विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. दौरा रद्द …
Read More »भाजपची एकात्म मानववादातून ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा : आमदार प्रशांत ठाकूर
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या पनवेलमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्तएकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जनमानसात ओळख आहे. अखंड समाजाचा विचार करणार्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »रायगड प्रीमिअर लिगसाठी खेळाडूंवर बोली
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्या 25 वर्षा खालील खेळाडूंसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटीमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंचा नुकताच बोली पद्धतीने लिलाव (ऑक्शन) झाला. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये करण्यात आला. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा …
Read More »महाराष्ट्र पुन्हा हादरला
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी केला अत्याचार डोंबिवली ः प्रतिनिधीअल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी मागील नऊ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत दोन अल्पवयीन आरोपीसह …
Read More »दिल्लीची हैद्राबादवर दणदणीत मात
दुबई : वृत्तसंस्था दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला. हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीच्या शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने या वेळी षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब …
Read More »ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता, मात्र काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता. यानंतर राज्य सरकारने त्यात आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडे पाठवल्यानंतर आज राज्यपालांनी …
Read More »कधी थांबणार बलात्कार?
तब्बल 29-30 समाजकंटकांनी सुमारे आठ महिने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करावेत ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. कुठलाही सुजाण नागरिक यामुळे शरमेने मान खाली घातल्याशिवाय राहणार नाही. डोंबिवलीतील या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटतील किंबहुना प्रसारमाध्यमे हे काम आवर्जून करतील. यामुळे महाराष्ट्राची उरलीसुरली अब्रूदेखील नष्ट होणार आहे. देशभरातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper