Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडात मुबलक पाणीसाठा

26 धरणे ओव्हरफ्लो, दोन धरणांत 90 टक्के पाणीसाठा रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 26 धरणे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. तर उर्वरित दोन धरणात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून ही दोन्ही धरणे भरून वाहण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे …

Read More »

सुकापूरमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात

कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राचेही उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेश गायकर

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी कामोठे येथील राजेश गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची नियुक्ती जाहीर करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी (दि. 17) झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात कोरोना लसीकरणाचा विक्रम

एकाच दिवसात दोन कोटींहून अधिक नागरिकांना डोस नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त होत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी शुक्रवारी (दि. 17) एकाच दिवसात देशात दोन कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम …

Read More »

आजी, माजी आणि भावी..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण औरंगाबाद ः प्रतिनिधीमराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 17) औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे आणि केंद्रीय …

Read More »

सुधागडातील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याच्या जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी गुरुवारी (दि. 16) पोलिसांनी उद्ध्वस्त केली. याबरोबर सापडलेला मुद्देमालदेखील नष्ट करण्यात आला. पाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मनोहर म्हात्रे, पोलीस नाईक कांचन भोईर व शिपाई रामसेवक …

Read More »

चणेरा येथे 41 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी रोह्यातील दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेने  जिल्हा शासकीय रक्तकेंद्राच्या सहकार्याने चणेरे येथील कुणबी समाज हॉलमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ यांनी केले. या वेळी चणेरा सरपंच प्रसन्ना सिनकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष भोईर, तसेच …

Read More »

कर्जतमध्ये कोरोना लसीकरण शिबिर

कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री कपालेश्वर मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरण शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रूपेश लाड, पूनम जगडुळे, रूपाली कांबळे, शाहीन …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात विविध सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 17) रोठ बुद्रुक (ता. रोहा)ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. तर रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून फळे वाटप करण्यात आले. तसेच कोलाड येथील कुष्ठरोगी  वसाहतीला ऑक्सिमीटर भेट देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या …

Read More »

नवी मुंबईत रुग्णालयांचे नियोजन; कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी करताना दुसर्‍या लाटेत जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली रुग्णालये कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. हे करत असताना सर्वसाधारण रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयांचे अधिक …

Read More »