Breaking News

महत्वाच्या बातम्या

माणगाव तालुका पत्रकार संघाचा महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे महाड पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रविवारी (दि. 1 ऑगस्ट) केले. रायगड जिल्ह्यातील महाड शहरासह परिसरात दि. 22 जुलै रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाड नगरीत सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांमधून व दुकानांमधून शिरून येथील …

Read More »

एक्स्प्रेस वे वर बसला अपघात दहा जण गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली बस खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास खालापूर हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार रमेश संभाजी थोरात (रा. कारवे, जि. सातारा) हे त्यांच्या ताब्यातील बस …

Read More »

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णाचाही प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा व चौल परिसरात कोरोना संसर्ग रोगाचा वाढता प्रादूभाव आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न राबविले जात आहेत, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. या लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णसुद्धा प्रवेश करत असल्याने कोरोना संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी …

Read More »

धडाकेबाज इलेव्हन संघ एनपीएलचा विजेता

पनवेल ः वार्ताहर नेरे प्रीमियर लीग (एनपीएल) 2021चा बक्षीस वितरण समारंभ नेरे हायस्कूल येथे नुकताच पार पडला. या वेळी धडाकेबाज इलेव्हन संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जनसेवा संघ नेरेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, दर्शन ठाकूर, योगेश तांबोळी, शंकर ठाकूर, …

Read More »

जखमी असूनही सतीश कुमार लढला; भारतीय बॉक्सरच्या झुंझारपणाचे कौतुक

टोकियो ः वृत्तसंस्था भारताचा 91 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला हरविले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेर्‍यांत जलोलोव प्रभावी ठरला. उझबेकिस्तानच्या बॉक्सरने सतीशचा 5-0 असा पराभव करून आपले पदक निश्चित केले. तत्पूर्वी त्याने आपला …

Read More »

पोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे नुकसान

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशिर या गावातील गणेश विसर्जन घाटाचे पोश्री नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या महापुरामुळे गणेशघाटासह तेथील रस्त्याचेही नुकसान झाले आहे. पोशिर गावातील गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट हा चिकनपाडा गावाच्या पुढे असलेल्या पोश्री नदीच्या तीरावर आहे. तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या या गणेश …

Read More »

वाल्मिकी मच्छीव्यावसायिक सहकारी संस्था

आज मी जरी सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदांवर काम करीत असलो तरी माझ्या सहकारामधील कामगिरीचे बीज मात्र पन्नास वर्षांपूर्वी आम्ही स्थापन केलेल्या वाल्मिकी सहकारी मच्छीव्यावसायिक संस्थेमध्येच आहे.  02 ऑगस्ट 1971 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला आज बघताबघता 50 वर्ष पूर्ण झाली.  आज या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षामधील सा-या घटना झर्रकन् आठवल्या. …

Read More »

कर्जत-शिरूर राज्यमार्गाने पश्चिम महाराष्ट्र जोडणार?

मराठवाडा आणि नगर भागातून येणारी वाहने पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करतात.त्यावेळी वाहतुक कोंडी सातत्याने होत असताना या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शिरूर-कर्जत या नवीन राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.दरम्यान,140 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या सर्वेक्षण कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या असून त्या कंपनीवर वन जमिनीच्या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली …

Read More »

शेकापचा उतरता आलेख

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचारसरणीशी निष्ठा असणारा ऋषितुल्य नेता निमाला. अभ्यासू, संयमी आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या या नेत्याला आपल्या अखेरच्या काळात पक्षाची झालेली पडझड पाहून दुःख वाटत होते. शेकापच्या वर्धापन दिनाला दोनच दिवस उरले असताना त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर, …

Read More »

गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन; सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर ः प्रतिनिधी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 31) सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब व …

Read More »