Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती. गेला …

Read More »

भारताची डिजिटल क्रांती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रूपी’चा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील नवे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ई रूपी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) शुभारंभ करण्यात आला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाऊचर आहे, जे डिजिटल पेमेंटचे …

Read More »

नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाडकरांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, अशी शिधासामुग्री देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही …

Read More »

‘इ स्टोर इंडिया’ची पूरग्रस्तांना मदत

पनवेल : प्रतिनिधी इ स्टोर इंडिया या सुपर बाजारच्या पनवेलच्या मालक व कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे यांनी महाड येथील पूरग्रस्त बांधवाना  मदतीचा हात दिला आहे. पनवेल शहरातील टपालनाका येथील मोमीनपाडामधील साई सारंग कॉ ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता वेदिक आयुरकेअर कंपनीने इ-स्टोर इंडिया …

Read More »

वडाळे तलावाच्या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. नवीन पनवेलकडून जुन्या पनवेल आणि अमरधामकडे जाणारा हा रस्ता सुस्थितीत असल्याने वाहन चालक व बाईक स्वार वेगाने गाड्या चालवत असल्याची बाब काही सतर्क नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. …

Read More »

भाजपच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील रहिवासी श्री देविदास जाधव हे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातून 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्काराचा कार्यक्रम भाजप कळंबोली आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक कमल कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कळंबोली शहर सरचिटणीस …

Read More »

नवी मुंबईत वाढवल्या कोरोना चाचण्या

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी उपाययोजना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन  प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल दोन …

Read More »

राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या योगिनी पाटीलला रौप्यपदक

पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील दोन मुलींनी 25 जुलै ते 31 जुलैदरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये योगिनी पाटील ही 52 किलो वजनी गटात खेळली व तिने रौप्यपदक जिंकले. योगिनीने प्राथमिक तसेच उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, प. बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. …

Read More »

सोनू सूद करणार भारताचे नेतृत्व; विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई ः प्रतिनिधी गरीब, त्रासलेल्या आणि गरजूंना मदत करणारा बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने अलीकडेच आपला 48वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त, जवळचे मित्र आणि बॉलीवूड स्टार्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह सोनूला त्याच्या वाढदिवशी विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर …

Read More »

ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत रशियाचा वाखलामोव्ह विजेता

मुंबई ः प्रतिनिधी दै. शिवनेरतर्फे माजी गृहराज्यमंत्री तथा भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वाढदिवसानिमित आयोजित ऑनलाइन विनाशुल्क बुद्धीबळ स्पर्धेत साखळी 11 फेर्‍यांमध्ये 10 गुण जिंकून रशियाचा फिडे मास्टर इगोर वाखलामोव्ह विजेता ठरला. वाखलामोव्हने उत्तम सरासरीच्या बळावर दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयला (10 गुण) द्वितीय स्थानावर टाकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, इन्स्टिट्यूट …

Read More »