Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेणमध्ये कोरोनाचा वाढता कहर, 10 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत चालली आहे. जुलै महिन्याच्या 10 दिवसांतच कोरोना संसर्गामुळे जवळपास 27 रुग्णांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत असून नगरपालिका, पोलीस तसेच आरोग्य प्रशासनावर ताण येत आहे. पेण तालुक्यात 24 जूनला एका दिवसात 100च्या वर रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची …

Read More »

वाढीव घरपट्टी रद्द करा; अन्यथा खोपोली भाजपचा आंदोलनाचा इशारा

खोपोली ः प्रतिनिधी येथील नगरपालिकेने आर्थिक वर्षात जी वाढीव घरपट्टी आकारली ती अन्यायकारक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ती रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना सोमवारी (दि. 12) दिले. मागील दोन वर्षांपासून कोविड महामारी तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. …

Read More »

बिघाडीची अवलक्षणे

गेली दीड-पावणेदोन वर्षे सत्तेला चिकटून बसलेले महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधाची सारी लक्षणे आता स्पष्टपणे दाखवू लागले आहे. हे सरकार कोणी पाडण्याची गरज नाही, आपल्या अंतर्विरोधानेच ते पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी केले होते. राजकारण्यांचे सोडा, अनेक राजकीय पंडितांचाही तोच अंदाज होता, तथापि इतका टोकाचा अंतर्विरोध …

Read More »

अलिबाग : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात तब्बल 69 जण पॉझिटिव्ह

अलिबाग ः प्रतिनिधीयेथील रायगड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून एकूण 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.अलिबागमधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत. …

Read More »

रायगडात जोरदार पर्जन्यवृष्टी

पाणी शिरले, दरडी कोसळल्या; जनजीवन विस्कळीत मुरूड ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, मुरूडसह अन्य काही ठिकाणी पाणी शिरले. त्याचबरोबर दरड कोसळणे, भिंत पडणे अशा पझडझीच्या घटना घडून वित्तहानी झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी (दि. 12) संपलेल्या 24 तासांत सरासरी 80.76 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट …

Read More »

पावसाच्या पुनरागमनामुळे रायगडात लावणीच्या कामांना वेग

अलिबाग : प्रतिनिधी पावसाने 12 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे रखडलेली भातलावणीची कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.  लावणीच्या कामाला आता वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली. कडक ऊन पडल्यामुळे …

Read More »

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील पूल कोसळला; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील जुना छोटा दगडी पूल रविवारी (दि. 11) कोसळला. त्या वेळी पुलावरून एक चारचाकी आणि दोन दुचाकी जात होत्या. ती वाहने पुलासह खाली कोसळली, मात्र वेळीच मदत मिळाल्याने चारचाकीमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले, तर एक दुचाकीस्वार वाहून …

Read More »

महाड-मढेघाट-पुणे मार्ग विकसित व्हावा

कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक विभाजनासोबतच हवामान आणि निसर्गाचे विभाजन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे झाले आहे. कोकण हा प्रांत अरबी समुद्राला समांतर असून आताच्या पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत समुद्रकिनारा आणि सह्याद्री यांच्यामधील  साधारण शंभर किमीच्या पट्ट्यातील डोंगराळ प्रदेशाला कोकण संबोधले जाते. आंबा, सुपारी, नारळ, काजूपासून वनौषधी वनस्पतीच्या जंगलांनी व्यापलेला हा …

Read More »

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली …

Read More »

महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ

केंद्राने पाठवली आरोग्य पथके नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोेरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी देशात अद्याप महाराष्ट्रासह पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करीत या राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठविली आहेत.याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती …

Read More »