पनवेलमध्ये तब्बल 25 हजार लाभार्थी; राज्य शासनाकडून केवळ घोषणा, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पनवेल : वार्ताहर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात पनवेल परिसरातील एकाही रिक्षाचालकाच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. पनवेल परिसरात तब्बल 25 हजार परवानाधारक रिक्षाचालक अजूनही …
Read More »कोरोनाविरुद्ध विश्वनाथ आनंद सरसावला
मदतीसाठी उभारणार फंड नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे हाहाकार माजला असून, जगभरातून भारतासाठी मदत मिळत आहे. जगविख्यात बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथ आनंद कोरोनाविरुद्धच्या सरसावला असून, तो मदतीसाठी फंड उभारणार आहे.पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेला विश्वनाथ कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाइन बुद्धिबळ खेळणार आहे. दुसर्या जगविख्यात स्पर्धकांसमवेत तो सामना खेळणार आहे. …
Read More »भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रमेश पोवार
मुंबई ः प्रतिनिधीभारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डब्ल्यू. व्ही. रामन यांच्याकडून ते प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील. एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिच्याशी झालेल्या वादामुळे दोन वर्षांपूर्वी पोवार यांना प्रशिक्षक पदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे क्रिकेट …
Read More »टीम इंडिया येणार मुंबईत
इंग्लंड दौरा करण्यापूर्वी क्वारंटाइन होणार मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडला जाणार्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी 19 किंवा 24 मे रोजी मुंबईत एकत्र येऊ शकतात. भारतीय संघ 2 जूनला चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. यापूर्वी संघाला क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.19 मे रोजी हे खेळाडू मुंबईत येऊन दोन आठड्यांसाठी क्वारंटाइन राहतील आणि …
Read More »रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोहा शहरात 7 मेपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र तो हटवल्यानंतर गुरुवारी (दि. 13) रोहा बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र …
Read More »कर्जतमधील श्री धापया महाराजांची जत्रा यंदाही रद्द
कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक वर्षांपासून होणारी जत्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या जत्रेच्या निमित्ताने होणारी कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आल्याने यंदा हा आखाडा कुस्ती विना राहणार आहे. ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेला दोन दिवसांची जत्रा …
Read More »घोड्यांचा चारा वाटपावरून माथेरानमधील दोन संघटनांत वाद
कर्जत : बातमीदार लॉकडाऊनमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील अश्वचालकांवर बिकट परिस्थिती ओढावली असून त्यांच्या घोड्यांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्राणीप्रेमी व अनेक दानशूर व्यक्तींनी घोड्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आणि माथेरानमध्ये अश्वखाद्याचा ओघ सुरु झाला. चार्याच्या या मुबलक मदतीमुळे येथील दोन संघटनांमध्ये …
Read More »लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या; पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची मागणी
पेण : प्रतिनिधी ऑनलाइन नाव नोंदणी करून रायगड जिल्ह्याबाहेरील नागरिक पेण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरणासाठीच्या ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेत बदल करून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी गुरुवारी (दि. 13) रायगड जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 45 …
Read More »कोरोना काळात बांधपाडा ग्रामपंचायतीचा आधार
गावात सॅनिटायझर फवारणी; रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत कोविड 19च्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथम संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, तसेच गावातील रुग्णांना धीर देत, त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून ग्रामपंचायतीने मोफत किराणा सामान व धान्य वितरण करण्यास सुरुवात …
Read More »पालीत नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू; फक्त मेडिकल दुकाने पूर्णवेळ राहणार उघडी
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाली शहरात शनिवार (दि.15) पासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी गुरुवारी (ता.13) दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 12) पाली तहसील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper