Breaking News

महत्वाच्या बातम्या

दिबां’च्या नावासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार -अॅड. मनोज भुजबळ

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. …

Read More »

पशुपक्ष्यांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

1. चातक पक्षी – पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक मनोहर म्हात्रे

पनवेल : वार्ताहर सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ अगदी सुरुवातीपासून वादाच्या भोवर्‍यात राहिले आहे. या वेळेस वाद चिघळला आहे तो नामकरणाचा. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची एक दिलाने अशी इच्छा आहे की, या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले …

Read More »

कळंबोली वसाहतीत गरजूंना धान्यवाटप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कळंबोली : बातमीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू जनतेला एक मदतीचा हाथ म्हणून कळंबोली वसाहतीमधील हजारो गरीब व गरजू नागरिकांना मोफत वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 24) राबविण्यात आला. या वेळी धान्यवाटप केल्यानंतर नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. …

Read More »

पनवेल परिसरात पुन्हा चोर्यांचे प्रमाण वाढले

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे सर्व जण मेटाकुटीस आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि लादण्यात आलेले निर्बंध यामुळे असंख्य नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीमुळे चोरी, लुटमार, लुबाडणूक अशा अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असलेल्या दिसत आहे. पनवेल परिसरात यामध्ये कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आदी ठिकाणी मध्यंतरीच्या …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा ‘दिबां’च्या नावासाठी आता व्यापक लढा!

10 जूनला मानवी साखळी तर 24 जूनला सिडको भवनावर धडकपनवेल : दीपक म्हात्रेप्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हा लढा …

Read More »

‘दिबा’ : विधानसभेतील एक बुलंद तोफ!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… महाराष्ट्रात सन 1972मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट …

Read More »

रायगडात 189 लसीकरण केंद्र; तीन लाख 77 हजार 924 जणांना लसीची मात्रा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 189 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 158 लसीकरण …

Read More »

1 जूननंतर दुकाने उघडू द्या; व्यापार्‍यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : प्रतिनिधी लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा …

Read More »