खालापूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात अग्रस्थानी असून, या आरोग्य केंद्राने आत्तापर्यंत एक हजार 800 च्यावर 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करून कोविड विषाणूपासून भयमुक्त केले आहे. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अनिल शहा, त्यांचे सहाय्यक अधिकारी तसेच संगिता चव्हाण, भगत इत्यादी कर्मचारी कोविड लसीकरण करण्यात …
Read More »अलिबागमध्ये आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मुरुड : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर या संस्थेने नुकतेच झूमवर ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म‘ हा आहारावरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आहारतज्ज्ञ रंजना तत्ववादी यांनी समतोल आहार व मधुमेही व्यक्तींसाठीचा आहार या विषयावर व्याख्यान दिले, तर आहारतज्ज्ञ डॉ. भक्ती फफे पाटील यांनी हृदयविकार व उच्च …
Read More »दिल्लीकडून विजयाचे ‘शिखर’ सर
मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर सहा गडी राखून हा विजय मिळवला.नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के. …
Read More »कर्जतमधील भाजी विक्रेते बाजारपेठेतून पोलीस मैदानात
कर्जत : प्रतिनिधी भाजीपाला घेण्यासाठी कर्जत बाजारपेठेत होणार्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने येथील भाजी व फळे तसेच अन्य विक्रेत्यांना सोमवार (दि. 19) पासून शहरातील पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. कर्जत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भाजी व फळ विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसतात. …
Read More »एकाची जमीन दुसर्याच्या नावावर
कर्जत तालुक्यातील घटना, शेतकर्याची न्यायालयात धाव कर्जत : बातमीदार तालुक्यातील गावंडवाडी येथील शेतकर्याने धारा भरताना सातबारा पहिला असता स्वतःची जमीन दुसर्याच्या नावावर झाल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे या शेतकर्याने थेट न्यायालयात धाव घेतली असून, कर्जत न्यायालयाने या घटनेचा तपास करण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत. मुंबईच्या जवळ असल्याने कर्जत तालुक्यातील …
Read More »वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या दुसर्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळपासूनच माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली. वीकेण्ड लॉकडाऊननमुळे माणगाव बाजारपेठेत दोन दिवस शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती. सोमवारी सकाळी आपल्याला लागणार्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी …
Read More »‘आरसीबी’च्या विजयाची हॅट्ट्रिक चेन्नई ः आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सला पराभूत करीत स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदविला. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या झंझावाती अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले आणि …
Read More »विदेशी मद्यासह महिलेला अटक; पनवेल रेल्वेस्थानकात कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी कोरोना निर्बंधांच्या काळात गोव्याहून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्या महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या क्राईम ब्रांचने पनवेल स्थानकात रविवारी (दि. 18) पहाटे पकडले. या महिलेकडून 40 हजारांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून, तिला राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले. 01134 मंगळुरू एक्स्प्रेस रविवारी पहाटे …
Read More »देशात कोरोनाचा हाहाकार!; दीड हजार मृत्यू; 2,61,500 नवे रुग्ण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रसार वेगाने होत असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अशातच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भयावह बाब म्हणजे वाढणार्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या …
Read More »एक्स्प्रेस वेवर गुंडांचा थरार; पोलिसांशी हुज्जत घालून हत्यारे असलेली कार सोडून त्रिकूट फरार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून हत्यारांनी भरलेली कार घेऊन त्रिकुटाने पोलिसांशी हुज्जत घालत पलायन केल्याची घटना घडली आहे. खालापूर पोलीस या तिघांचा कसून शोध घेत आहेत. एका स्विफ्ट कारमधून काही इसम धारदार हत्यारे घेऊन शनिवारी (दि. 17) रात्री एक्स्प्रेस वेवरून पुण्याच्या दिशेने जात होते. कोरोना परिस्थितीमुळे खालापूर टोलनाक्याजवळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper