Breaking News

महत्वाच्या बातम्या

नागोठणे शहरात औषध फवारणी

नागोठणे : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीकडून रविवार (दि. 11) पासून संपूर्ण शहरात  सोडियम हैपो क्लोराईड या औषधाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. रविवारी ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी बस स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र येथून औषध फवारणी सुरू करण्यात आली. शहरातील सर्व आळी, चौक याठिकाणी ही फवारणी करण्यात …

Read More »

ती एक राजयोगिनी….

पटवर्धन काकूंची तब्येत गेले काही दिवस बरी नव्हती. आज पहाटे त्या गेल्या. मला त्यांची पहिली भेट आजही लख्ख आठवतेयं. आमचे लग्न ठरल्यावर मी पहिल्यांदा पनवेलला आले, तेव्हा माझी ओळख करून घ्यायला काकू घरी आल्या होत्या. गोरापान गोल चेहरा, हसरी तरी करारी नजर, बघताक्षणी एक आदरयुक्त जिव्हाळा वाटला. नवीन सुनेसाठी म्हणून …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अलिबाग : जिमाका क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 11) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी महाराष्ट्रात समतेचा संदेश …

Read More »

पर्यावरणपूरक विकास

माथेरान शहर आणि परिसरातील डोंगररांगा या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला बाधा करणारी कोणत्याही प्रकारांची कामे माथेरानमध्ये केली जात नाहीत. माथेरान गिरिस्थान नगर परिषददेखील पर्यावरणपूरक विकासकामे व्हावीत यासाठी पुढाकार घेत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत यासाठी मुंबईला महानगर प्रदेश …

Read More »

सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग

अग्निशमन दलाची तत्परता; अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर पनवेल ओएनजीसीजवळ रविवारी (दि. 11) घरगुती सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या ड्रायव्हर केबिनला आग लागली होती. घटनास्थळी सिडको व पनवेल महापालिका अग्नीशमन दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी दाखल होत तत्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  एचपी गॅस सिलिंडरने भरलेला शुभम ट्रान्स्पोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच …

Read More »

कडक निर्बंधांमुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटली

नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे शनिवार आणि रविवारी मुंबई बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये, तसेच पनवेल बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटलेली पहावयास मिळाली. बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असली तरी त्याचा परिणाम बाजारभावावर फारसा झाला नव्हता. ग्राहकांना आवश्यक तेवढा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती व्यापार्‍यांनी …

Read More »

करंजाडे वसाहतीत विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात आल्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई कारण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार तहसील, ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांत 30 जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोना व्हायरसने संपूर्ण …

Read More »

तळोजा कारागृहातील कैद्यांचेही होणार लसीकरण

पनवेल : वार्ताहर राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूसंख्येतही भर पडली आहे. कोरोना लसीकरणाचे प्रमाणही वाढवले जात आहे, तळोजा कारागृहातील 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील सहव्याधी 321 कैदी असून त्या कैद्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तळोजा कारागृह प्रशासनाने पनवेल महापालिकेबरोबर चर्चा केली असून लवकरच पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात आजपासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. प्रशासनाकडून लसींचा पुरवठा न झाल्याने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला होता, मात्र 5000 कोविशिल्ड लसींची उपलब्धता झाली असल्याने सोमवार  (दि.12) पासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 21 लसीकरण केंद्र …

Read More »

टाळेबंदी : जनतेचे काय?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत. खरेतर राज्यात सद्यस्थितीत लॉकडाऊनसदृश निर्बंध लागू असून, वीकेण्डला दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन आहे. आता पुढील निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. वैश्विक महामारी कोरोनाने जगभर कहर माजवलेला आहे. भारतातही त्याचा …

Read More »