मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. 250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या मिशन ऑक्सिजनसाठी सचिनने तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत …
Read More »पृथ्वी वादळात कोलकाता गारद
अहमदाबाद ः वृत्तसंस्था सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर आयपीएलच्या साखळी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 16.3 षटकांतच विजय साकारला. पृथ्वीला …
Read More »लसीकरण केंद्रावर तात्पुरता निवारा शेड
पनवेल : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे कोविडविरोधी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच उन्हाची दाहकता वाढत असल्याने लसीकरण केंद्रावर येणार्या नागरिकांसाठी भाजपच्या नगरसेविका अरुणा भगत व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भगत यांच्या माध्यमातून कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र …
Read More »कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढले; पनवेलसह, नवी मुंबईत संचारबंदीतही रुग्णबळी अधिक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कडक संचारबंदीनंतर पनवेलसह नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, मात्र कोरोना मृत्यूंचे प्रमाण कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिवसाला सरासरी आठ ते नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. नवी मुंबई शहरात 50 वर्षांवरील बाधितांचे मृत्यू अधिक असून शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1350च्या …
Read More »रोह्यातील रोठ बुद्रुक गावात जंतुनाशक फवारणी
‘क्लॅरिअंट’ची सामाजिक बांधिलकी रोहे : प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून क्लॅरिअंटकडून कारखान्यालगतच्या रोठ बुद्रुक गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. रोठ बुद्रुक गावामध्ये काही कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच नितीन वारंगे …
Read More »सुधागडात कोरोनाविषयी जनजागृती
प्रभातफेरी व रंजक गाण्यांतून प्रबोधन पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. तालुक्यातील अडुळसे गाव आणि परिसरातील सात वाड्यांवर गुरुवारी (दि. 29) कोरोना विषयक जनजागृती …
Read More »मानवतेचे निशाण मिरवू महाराष्ट्र दिनी!
महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याने या काळात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुतात्म्यांचे बलिदान विसरून महाराष्ट्र दिन चिरायू होऊ शकत नाही हे जरी खरे …
Read More »लॉकडाऊनमुळे मच्छीमार होड्या किनार्यावर
पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागते, त्या अनुषंगाने मुरूडमधील कोळी बांधव आपल्या मच्छीमार होड्या साधारण 15 मेपासून किनार्यावर लावतात. त्यानंतर होडीची साफसफाई, होडीतील सर्व जाळ्या स्वच्छ धुवून आपल्या घरी नेऊन ठेवतात. पाऊस सुरु होण्याआधी होड्या साकारण्यात येतात, मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने सर्वांनाच त्रस्त केले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी, …
Read More »कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटाची उंची वाढविणार; प्रवाशांना दिलासा
कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि लोकल किंवा लांबपल्ल्याची गाडी यांच्यामधील अंतर जास्त असल्याने गाडी पकडताना एखाद्या प्रवाशाचा अपघात होऊ शकतो. याबाबत पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर फलाट क्रमांक तीनची उंची लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकात एकूण चार …
Read More »रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी, काही दुकानेही उघडी
रोहे ः प्रतिनिधी कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र रोहा शहरात गुरूवारी (दि. 29) अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. महत्वाचे म्हणजे कडक निर्बंध लागू असतानाही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रोह्यातील अन्य काही दुकाने गुरूवारी दिवसभर उघडी ठेवून व्यापारी व्यवसाय करताना दिसले.देशात, राज्यात कोरोनाचे रूग्ण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper