नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या दैनंदिन वाढीमुळे आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा घटले आहे. यातच कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुध्दा चिंताजनक आहे. नवी मुंबईतील मृत्युदरात वाढ झाली असून दोन महिन्यांत 150 जणांनी आपले प्राण …
Read More »आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी एबी डिव्हिलियर्स उत्सुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. यंदा भारतात होणार्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. याबाबत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर याच्याशी चर्चा करणार आहे.कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर डिव्हिलियर्स म्हणाला, मागच्या वर्षी त्याने …
Read More »ऑरेंज कॅप आली ‘गब्बर’कडे
मुंबई ः प्रतिनिधीआयपीएल 2021 स्पर्धेत दिल्ली संघातून खेळण्यार्या शिखर धवनने आपल्या नावावर ऑरेंज कॅप केली आहे. काही तास बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या डोक्यावर मानाची कॅप राहिली, मात्र पंजाबविरुद्ध धवनने चांगली कामगिरी करीत ऑरेंज कॅपचा मान पटकावला.यापूर्वी धवनने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 54 चेंडूंत 85 धावांची खेळी केली होती. त्यात 10 चौकार आणि दोन …
Read More »कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेचे बार्सिलोनाला जेतेपद
माद्रिद ः वृत्तसंस्थालिओनेल मेस्सीच्या शानदार दोन गोलमुळे बार्सिलोनाने अॅथलेटिक बिलबाओचा 4-0 असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.दुसर्या सत्रात अवघ्या 12 मिनिटांच्या अंतराने चार गोल लगावत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अँटोनी ग्रिझमन याने 60व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसर्याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी …
Read More »खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात जिल्ह्यात अग्रेसर
खालापूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात अग्रस्थानी असून, या आरोग्य केंद्राने आत्तापर्यंत एक हजार 800 च्यावर 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करून कोविड विषाणूपासून भयमुक्त केले आहे. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अनिल शहा, त्यांचे सहाय्यक अधिकारी तसेच संगिता चव्हाण, भगत इत्यादी कर्मचारी कोविड लसीकरण करण्यात …
Read More »अलिबागमध्ये आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मुरुड : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअर या संस्थेने नुकतेच झूमवर ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म‘ हा आहारावरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आहारतज्ज्ञ रंजना तत्ववादी यांनी समतोल आहार व मधुमेही व्यक्तींसाठीचा आहार या विषयावर व्याख्यान दिले, तर आहारतज्ज्ञ डॉ. भक्ती फफे पाटील यांनी हृदयविकार व उच्च …
Read More »दिल्लीकडून विजयाचे ‘शिखर’ सर
मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर सहा गडी राखून हा विजय मिळवला.नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के. …
Read More »कर्जतमधील भाजी विक्रेते बाजारपेठेतून पोलीस मैदानात
कर्जत : प्रतिनिधी भाजीपाला घेण्यासाठी कर्जत बाजारपेठेत होणार्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने येथील भाजी व फळे तसेच अन्य विक्रेत्यांना सोमवार (दि. 19) पासून शहरातील पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. कर्जत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भाजी व फळ विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसतात. …
Read More »एकाची जमीन दुसर्याच्या नावावर
कर्जत तालुक्यातील घटना, शेतकर्याची न्यायालयात धाव कर्जत : बातमीदार तालुक्यातील गावंडवाडी येथील शेतकर्याने धारा भरताना सातबारा पहिला असता स्वतःची जमीन दुसर्याच्या नावावर झाल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे या शेतकर्याने थेट न्यायालयात धाव घेतली असून, कर्जत न्यायालयाने या घटनेचा तपास करण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत. मुंबईच्या जवळ असल्याने कर्जत तालुक्यातील …
Read More »वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या दुसर्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळपासूनच माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली. वीकेण्ड लॉकडाऊननमुळे माणगाव बाजारपेठेत दोन दिवस शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती. सोमवारी सकाळी आपल्याला लागणार्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper