Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल परिसरातील पाणीप्रश्नी भाजप शिष्टमंडळाची एमजेपीच्या अभियंत्यांसोबत चर्चा

लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)चे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत …

Read More »

तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमिन भालदार, विजय शिंदे, प्रदीप सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.21) पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष …

Read More »

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांना पदमुक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आल्या …

Read More »

नैना क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल (प्रतिनिधी): नैना अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायत हद्दीतील मोडकळीस आलेल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, त्या अनुषंगाने या संदर्भात शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. …

Read More »

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सहलीसाठी आलेल्या खाजगी बसचा अपघात; सह चालकाचा मृत्यू

खोपोली प्रतिनिधी: मुंबई पुणे दृतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईला मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला अपघात होऊन यात सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून त्यांना नगरपरिषद रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदरचा अपघात मेळ गावाच्या हद्दीत बुधवार सकाळी सातच्या दरम्यान घडला. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मुंबई …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून सक्षम बनविले-लोकनेते रामशेठ ठाकूर

माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Read More »

पंतप्रधान मोदींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाचे पर्व पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चौटा लोकसभा प्रवास दौर्‍यानिमित्त महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍याअंतर्गत त्यांनी पनवेलमध्ये रविवारी (दि. 17) सभा …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी (दि.16) प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा झाला. या वेळी शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे …

Read More »

खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. संजय दिनकर भोपी यांच्या स्मरणार्थ आनंदी ग्रुप अंतर्गत संजय भोपी स्पेशल क्लब, मॉर्निंग योग ग्रुप, अलर्ट सिटीझन फोरम, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक धाव आरोग्यासाठी ही महिला मॅरेथॉन रविवारी (दि.17) …

Read More »

निवडणुकीची हवा वाढतेय

राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की… प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप घेऊ लागलीय आणि एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम क्षेत्रातील माहौल अर्थात वातावरण बदलत चाललंय हे तुम्हीही अनुभवत आहात. हाच मूड आहे अनेक प्रकारचे जुने व नवीन राजकीय चित्रपट पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि शक्य तितके राजकारण समजून …

Read More »