उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव गावातील अनेक तरुणांनी तसेच केगाव ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच विलास काठे, अरविंद पवार यांनी रविवारी (दि. 13) उरण भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित …
Read More »महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवहेलना
कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. …
Read More »मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही -कोळसे पाटील
नागोठणे : प्रतिनिधी सत्याग्रह कसा असतो व तो कसा करायचा असतो, हे येथील जनतेला शिकवून दिले आहे. 36 वर्षांपूर्वी सरकारी कंपनीशी केलेला करार आता रिलायन्सला सुद्धा लागूच होत असून कोणताही पंगा न घेता तसेच कंपनी बंद न पाडता आंदोलन चालूच राहणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी स्पष्टोक्ती …
Read More »चणेरे ग्रामस्थ जनहित याचिका दाखल करणार
एकात्मिक नवनगर वसाहत रद्द प्रकरण पनवेल : प्रतिनिधी मुंबई आणि नवी मुंबई वरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात सिडकोच्या माध्यमातून एकात्मिक नवनगर वसाहत उभारण्यात येण्याची युती शासनाची अधिसूचना ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याने रायगड जिल्ह्यातील 40 गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याविरोधात चणेरे ग्रामस्थ सेवा मंडळ …
Read More »मराठा आंदोलकांची पोलिसांकडून नाकाबंदी
रसायनी : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 14) मराठा समाज बांधव व भगिनी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मराठा समाज आंदोलकांची नाकाबंदी करण्यात येत आहे. रविवारी (दि. 13) विविध मार्गांवर पोलीस प्रत्येक गाडीची पाहणी करताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने …
Read More »‘…तर जानेवारीपासून भारतात लशीकरण’
मुंबई ः प्रतिनिधीकोरोनावरील कोविशिल्ड लस तयार करणार्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोरोना लशीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लशीला मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लशीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.इकॉनॉमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, या महिन्याच्या …
Read More »मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात
महिला आयोगाच्या अध्यक्षांचे विधान रायपूर ः वृत्तसंस्थामुली, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्काराच्या तक्रारी करतात, असे बेधडकवक्तव्य छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष किरणमयी नायक यांनी …
Read More »खालापूर टोलनाक्यावर बर्निंग कार
खालापूर ः प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) वाहने पेटण्याचे सत्र सुरूच असून, रविवारी (दि. 13) खालापूर टोलनाक्यावर उभ्या कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली. या घटनेत पती-पत्नी बालंबाल बचावले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सलीम खानेवाला (वय 47) व त्यांची पत्नी आजम (वय 39, रा. मिरा रोड, मुंबई) हे आपल्या डस्टर …
Read More »मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका!
देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा मुंबई ः प्रतिनिधीमराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे याबाबत काही शंकाच नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असे म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार! रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या …
Read More »राज्यात अघोषित आणीबाणी : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली असे वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोलले की तुरुंगात टाकले जाते आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जाते आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना रणोत यांच्या प्रकरणात खरे तर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper