पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 108 नव्या कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 160 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण 9) तालुक्यातील 68, अलिबाग 10, पेण नऊ, रोहा चार, उरण, कर्जत व श्रीवर्धन प्रत्येकी तीन, खालापूर व …
Read More »अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा
मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा या मागणीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मशाल मोर्चा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन मराठा …
Read More »भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई; ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी धडाकेबाज भारतीय लष्कराकडून कारवाया केल्या जात आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात 12 महिन्यांच्या कालावधीत 157 दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. दोन दिवसांपूर्वीच पुलवामा येथील मलंगपुरामध्ये राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत …
Read More »माथेरान-अमन लॉज शटल सेवा आजपासून
कर्जत : बातमीदार मिनिट्रेनची माथेरान ते अमन लॉज शटल बुधवार (दि. 4)पासून धावणार आहे. कोरोनामुळे माथेरान ठप्प झाल्यानंतर काही दिवसांत मिनिट्रेनसुद्धा बंद करण्यात आली. तेव्हापासून शटल सेवाही बंद होती. अनलॉक अंतर्गत 2 सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक येऊ लागले, पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटरचे अंतर चालताना पर्यटकांची …
Read More »विकासासाठी कटिबद्ध -आमदार महेश बालदी; बेलपाडा रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जेएनपीटी बंदराच्या विकास निधीतून दास्तान फाटा ते बेलपाडा गावातील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होत आहे याचा आम्हा लोकप्रतिनिधींना निश्चित अभिमान वाटत असून, बेलपाड्यासह विविध गावांच्या विकासासाठी या मतदारसंघाचा लोकसेवक म्हणून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार …
Read More »कौशल्याचार्य रेखा घरत यांचा सत्कार
रेवदंडा : प्रतिनिधी कौशल्याचार्य या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित चौल येथील रेखा संदीप घरत यांचा जन शिक्षण संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा सोमय्या यांच्या उपस्थितीत व माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थान अलिबाग-रायगडच्या प्रशिक्षक आणि चौलच्या चंपावती स्वयंम …
Read More »भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर मंडलाची कार्यकारिणी बैठक उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 2) झाली. या बैठकीत पनवेल शहर मंडलमधील महिलांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »ओबीसी समाज बांधव एकटवले; विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी समाज बांधवांना असलेले आरक्षण कायम ठेवावे तसेच विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी यासाठी मंगळवारी (दि. 3) राज्यव्यापी आरक्षण बचाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार ओबीसींनी रायगड जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांसमोर एकत्र येऊन ओबीसी बचाव आंदोलन केले. पनवेलमध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल …
Read More »पनवेल महानगरपालिकेत बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाच वर्षाखालील 47 हजार 606 बालकांना रविवारी संपूर्ण दिवसभरात पल्स पोलिओ लसीकरणाचे डोस देण्यात आले. महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागातर्फे शहरात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली. तसेच 2 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत उर्वरित बालकांसाठी विशेष लसीकरण मोहिमेत घरोघरी जाऊन …
Read More »‘महिलांनी वस्तू विक्री करण्यासाठी नवी मुंबई पालिकेने जागा द्यावी‘
नवी मुंबई : बातमीदार महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी महापालिकेने जागा द्यावी, अशी मागणी भाजप कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीत समाजातील कष्टकरी महिला, माता, भगिनी पुन्हा एकदा नव्याने कुटूंबाची आर्थिक घडी बसवण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper