Breaking News

महत्वाच्या बातम्या

संघटनेसाठी काम करणे महत्त्वाचे

भाजपच्या उमाताई खापरे यांचे प्रतिपादन; दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाची आढावा बैठक माणगाव : प्रतिनिधी पद हे शोभेसाठी घेवू नये तर संघटनेचे पद घेतले तर प्रत्येकाने संघटनेसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी माणगाव येथे मार्गदर्शन करताना सांगितले. दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा …

Read More »

रायगडात 142 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 128 जण कोरोनामुक्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 21) तालुक्यातील 114), खालापूर नऊ, कर्जत सात, अलिबाग तीन, उरण, पेण व माणगाव प्रत्येकी दोन आणि मुरूड, सुधागड व महाड …

Read More »

महाराष्ट्रात आणीबाणी 2.0; दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे पोस्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून 1975च्या आणीबाणीशी केली जात आहे. त्यातच आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावत राज्यात आणीबाणी 2.0 लागल्याचे नमूद केले आहे. वास्तुविशारद अन्वय …

Read More »

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

मुंबई : प्रतिनिधी अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 6) दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह आयकास्ट स्लॉशस्काय …

Read More »

खोपोलीजवळ केमिकल कंपनीत स्फोट; दोन ठार, आठ जण जखमी

खालापूर : प्रतिनिधी खोपोलीजवळील ढेकू औद्योगिक क्षेत्रातील साजगाव येथील जेसनोवा फार्मसिटिकल अ‍ॅण्ड स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीत गुरुवारी (दि. 5) मध्यरात्री स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील ढेकू आर्कोस औद्योगिक प्रिमायसेसमधील जेसनोवा कंपनीत मध्यरात्री 2.30च्या …

Read More »

महिलांच्या संरक्षणासाठी सक्षम टीम तयार करणार; भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम टीम तयार करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे यांनी गुरुवारी (दि. 5) येथे दिली. उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

भाजपच्या आंदोलनाला यश; तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्गाची एक लेन वाहतुकीसाठी खुली

पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले असून, चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे तसेच येत्या सोमवारपासूनसंपूर्ण भुयारी मार्ग सुरू …

Read More »

साहित्यसंपदा समूहातर्फे शिक्षकरत्न पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त निवृत्तीनंतरही समाजात भरीव योगदान देणार्‍या शिक्षकांचा गौरव मंगळवारी (दि. 3) ’शिक्षकरत्न’ पुरस्कार देऊन साहित्यसंपदा समूहातर्फे शिक्षकदिनाचे औचित्यसाधून करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच समूह संस्थापक वैभव दिलीप धनावडे यांनी केली. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिक्षकांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. या वेळी पनवेल येथील प्रा. फातिमा मुजावर, महाराष्ट्र …

Read More »

पुण्याच्या युवकाचा कळंबोलीत खून

पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवळच असलेला स्मृतीवन गार्डनमध्ये गुरुवारी एक मृतदेह आढळून आला. 31 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. ओळखपत्र आणि पाकिटातील डायरी वरून मृतांची ओळख पटली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. दरम्यान कळंबोली पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध …

Read More »

खारघर येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर प्रभाग 5 येथील रस्त्याच्या दुरुस्ती विषयी प्रभाग समिती माजी सभापती व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सिडकोकडे सतत पत्रव्यवहार केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश येऊन सेक्टर 4 व सेक्टर 3 येरळा हॉस्पिटल समोर रस्त्याच्या कामाला गुरुवारी (दि. 5) सुरुवात झाली. …

Read More »