Breaking News

महत्वाच्या बातम्या

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या व्यक्तींचा नुकताच रावे येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. श्री रायबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, …

Read More »

नवीन पनवेलच्या घरफोडी प्रकरणात पाच नेपाळी सुरक्षारक्षकांना अटक

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर-19 मधील डॉ. रविंद्र इनामदार यांच्या घरात तब्बल 82 लाख रुपयांची घरफोडी करणार्‍या टोळीतील पाच नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेले तीन सुरक्षा रक्षक नेपाळ येथे पळून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-19 …

Read More »

भारतीय मजदूर संघाची आज पनवेल प्रांत कार्यालयावर निदर्शने

उरण : वार्ताहर लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदी मागे  घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने  पनवेल प्रांत कार्यालयावर बुधवारी (दि. 28) सकाळी 11 ते 1 या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार …

Read More »

पनवेलसाठी जास्तीच्या बेडची उपलब्धता करा

नगरसेविका दर्शना भोईर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल क्षेत्राकरीता कोविड-19च्या अनुषंगाने जास्तीच्या बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या …

Read More »

ओबीसी संघर्ष समिती म्हसळ्यात काढणार मोर्चा

मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन म्हसळा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच …

Read More »

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे होणार सुशोभीकरण; संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि. 27) झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा  सुशोभीकरण कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी …

Read More »

पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; शिखर बँक घोटाळा

मुंबई : प्रतिनिधी शिखर बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर मोहन अरोरा यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यांच्यासोबत इतरही काही लोकांनी …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही आता जमीन खरेदी करता येणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करून तेथे स्थायिक होऊ शकते, मात्र शेतजमिनीवरील बंदी अद्याप कायम असणार आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाने मंगळवारी (दि. 27) अधिसूचना जारी केली आहे. याबाबत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग …

Read More »

मुंबईत हाय अलर्ट!; दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ड्रोनला बंदी

मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, संपूर्ण शहरात ड्रोन तसेच तत्सम गोष्टींच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी मुंबईत गर्दीच्या ठिकाणांना आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करू …

Read More »

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली; सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीमुळे संताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी सुरू झाली त्या वेळी सरकारी वकील अनुपस्थित होते. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी (दि. 27) पहिल्यांदाच ही सुनावणी झाली. या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले …

Read More »