पनवेल : बातमीदार बंद गाळ्याचे शटर तोडून घरफोडी करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, वर्कशॉप फॅब्रिकेशनचे साहित्य, गुन्ह्यातील दुचाकी आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. खांदा कॉलनी, सेक्टर 9 येथील मेडिकलच्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईलची चोरी केली होती. …
Read More »नवरात्रीतील गरब्यावर कोरोनाचे सावट; नृत्य नसल्याने तरुण-तरुणींचा हिरमोड; व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर
पनवेल : वार्ताहर मार्च मध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि अनेक लहान-मोठ्या व्यापार्यांना तसेच मोलमजुरी करणार्यांना देशोधडीला लावले ते आजतगायत. अनेकांचे आराध्य दैवत गणपती सण सुद्धा सुना सुना गेला. त्यानंतर आता 17 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे गरबा नृत्याचा कार्यक्रम कुठेही होणार नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून अनेक लहान …
Read More »नवी मुंबईत बाल मृत्यूदर आटोक्यात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित बालकांचे मृत्युचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले असून आतापर्यंत 10 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील फक्त एकच बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी हे नक्कीच दिलासादायक वृत्त आहे. तसेच मनपाच्या रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कोरोनाबाधित महिलांची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने …
Read More »‘…तर मुंबईत लोकल प्रवासाची परवानगी’
मुंबई : प्रतिनिधीसर्वसामान्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारतर्फे बोलताना रेल्वेगाड्यांच्या फेर्या वाढवण्यास हरकत नाही, असेही म्हटले.कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक महिने रेल्वेसेवा बंद होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी विशेष लोकल सुरू …
Read More »रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे
नवी दिल्ली : वृत्तसंस्थारिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले. आर्थिक वर्ष 2021मध्ये जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भाजपच्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन
उरण : वार्ताहरजनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यात कार्यतत्पर असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे कार्य आम्ही जनतेचे सेवक म्हणून हाती घेतले आहे. त्याच भावनेने उरण मतदारसंघात मागील वर्षी 500 कोटींची कामे मार्गी लावली आहेत. आज केंद्रात मोदी सरकार आहे, तर राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. या सत्तेच्या माध्यमातून …
Read More »कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देणार -आमदार प्रशांत ठाकूर
‘डाऊ केमिकल्स’च्या कामगारांनी स्वीकारले जय भारतीय जनरक कामगार संघटनेचे सदस्यत्व पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत या युनिटच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) …
Read More »राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडले : संभाजीराजे
तुळजापूर : मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडले आहेत. या सरकारमध्ये समन्वयच नाही, असा आरोप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असेही त्यांनी …
Read More »माथेरानच्या दस्तुरीत पर्यटकांची फसवणूक
पालिका आणि पोलिसांनी घोडेवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत : बातमीदार – माथेरानचे प्रवेशव्दार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असून, याबाबत सोशल मीडियावर तक्रारीही झाल्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. काही घोडेवाले पर्यटकांची फसवणूक, दिशाभूल हे करतात. पण नाव अश्वपाल संघटनेचे खराब होत आहे. त्यामुळे …
Read More »रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा रद्द कराव्यात, पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी, 2020-21 या शैक्षणिक वर्षात एसइबीएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संरक्षण करावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालायासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, खोपोलीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper