नॅरोगेज ट्रॅकवर गवत, माती आणि दगड कर्जत ः बातमीदारमाथेरान पर्यटनस्थळी जाण्यासाठी मध्य रेल्वेची मिनीट्रेन आणि नेरळ-माथेरान घाटरस्त्याने होणारी वाहतूक दरवर्षी पावसाळ्यात बंद राहून मिनीट्रेनची वाहतूक 15 ऑक्टोबरला पुन्हा सुरू होते, मात्र या वर्षी मिनीट्रेन वेळेत सुरू होण्यात अनेक अडचणी आहेत. मिनीट्रेनच्या मार्गात गवत, माती आणि दगड आल्याने शटल सेवा सुरू …
Read More »एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राला मिळणार अखंडित वीजपुरवठा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरासह सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राला अखंडित वीजपुरवठा यापुढे होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील महिन्यात फिडर कार्यान्वित होईल, अशी माहिती एमजेपीच्या इलेक्ट्रिकल विभागाकडून सांगण्यात …
Read More »हुतात्म्यांना अभिवादन
चिरनेर (ता. उरण) ः भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पोलिसांनी शासकीय सलामी दिल्यानंतर उपस्थितांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे …
Read More »पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यदायी उपक्रम
मास्क, सॅनिटायझर व औषधाचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व औषध वाटप करण्यात आले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला.या …
Read More »धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन
पनवेल ः बातमीदारएसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर पुकारलेल्या ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ या आंदोलनाला पनवेल तालुक्यात प्रतिसाद मिळाला. धनगर समाजाच्या नागरिकांनी कळंबोलीमधील मायाक्का मंदिरात ढोल वाजवून राज्य सरकारविरोधात निदर्शने केली.राज्यातील धनगर समाजाकडून मागील काही वर्षांपासून एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. …
Read More »मराठा समाजाचा रायगडात एल्गार
आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन महाविकास आघाडी सरकारचा निषेध पनवेल ः वार्ताहर, प्रतिनिधीमराठा आरक्षण लागू व्हावे याकरिता राज्य सरकारने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 25) रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पनवेलमध्ये मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या …
Read More »पनवेल तालुक्यात 328 नवे कोरोनाबाधित
11 जणांचा मृत्यू; 375 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.24) कोरोनाचे 328 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 264 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 286 …
Read More »बॉलिवुडचे शुद्धीकरण
आजची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतच श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग अशा अनेक फिल्मी तारकांना तसेच फॅशन डिझाइनर सिमॉन खंबांटा हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले असून त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवुडमधील दिग्गजांच्या कपाटात दडलेले किती सापळे बाहेर येतील ते आताच …
Read More »रायगड जिल्ह्यात 528 नवे पॉझिटिव्ह; 23 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 528 नव्या कोरोना रुग्णांची आणि 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 24) झाली, तर दिवसभरात 705 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 328, अलिबाग 47, पेण 34, माणगाव 21, कर्जत 20, खालापूर 18, उरण 16, महाड 15, रोहा 10, श्रीवर्धन आठ, पोलादपूर …
Read More »मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकू नये!
महाड कोविड सेंटरवरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कडाडले महाड : प्रतिनिधीकोरोना महामारी नियंत्रित करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. महाड कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा निर्माण होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जबाबदारी झटकू नये, असा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी संताप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper