Breaking News

महत्वाच्या बातम्या

नोंदणी व व मुद्रांक विभागातील कमर्चार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील …

Read More »

हाथरसच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये …

Read More »

दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद

अलिबाग : प्रतिनिधी दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकूण 45 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने 14 सप्टेंबर रोजी पेण-खोपोली मार्गावर गागोदे येथे दरोडा टाकला होता. नागोठणे येथील सुप्रीम कंपनीचा एक ट्रक प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या घेऊन चेन्नईला निघाला होता. …

Read More »

पर्यटनाला हिरवा कंदील

रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजणार पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित आहे. रायगड जिल्ह्यात प्रख्यात पर्यटनस्थळे व निसर्गरम्य सागरी किनारे आहेत. यंदा कोरोनाच्या महामारीत पर्यटन ठप्प झाल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला, मात्र अनेक महिन्यांनी पुन्हा पर्यटनाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आता गजबजू लागली आहेत. …

Read More »

एकदरात भीषण पाणीटंचाई

आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहराच्या अगदी जवळ असणार्‍या एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुमारे 3500 लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने …

Read More »

जागतिक पर्यटन दिनानिमित्त वृक्षारोपण

कर्जत ः बातमीदार जागतिक पर्यटनदिनानिमित्त येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमधील पर्यटकांनी वृक्षारोपण केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माथेरानमधील रिसॉर्ट व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थापक अमोल भारती यांनी रिसॉर्टमधील पर्यटकांना जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त पर्यटकांनी उपक्रमात सहभागी …

Read More »

उद्याने सुरू करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

पेण ः प्रतिनिधी अनलॉकच्या प्रक्रियेस बराच कालावधी होऊनही पेणमधील सर्व उद्याने बंद आहेत. कोविडमधून बरे झालेले रुग्ण तसेच आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरून नैसर्गिकरीत्या श्वसनातून येणार्‍या ऑक्सिजनची मात्रा वाढविणे गरजेचे आहे. पेण शहरात छोटी छोटी उद्याने, क्रीडांगणे असून ती सहा महिन्यांपासून बंद आहे. याबाबत ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या व योगा फॉर जॉय …

Read More »

पोलीस भरतीला स्थगिती द्या!

मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलनाचा इशारा मुरूड ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असताना शासनाकडून पोलीस भरतीचा घाट घातला जात आहे. हा सरळसरळ मराठा समाजावर अन्याय आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने कोणतीही भरती करू नये. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे देताना स्थगिती आदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी घटनातज्ज्ञांचा सल्ला …

Read More »

गरम पाणी शरीरासाठी लाभदायक

आरोग्य प्रहर पाणी शरीरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. सकाळी उठल्यानंतर दररोज एक ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे तुम्ही ताजेतवाणे होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे, मात्र गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. आयुर्वेदातदेखील …

Read More »

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण ः प्रतिनिधी नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मांडल्या, मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून निराशाच पदरी पडत असल्याने नोंदणी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारपासून (दि. 1) बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. …

Read More »