Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगड जिल्ह्यात 308 नवे पॉझिटिव्ह; 15 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात 308 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 369 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 173 व ग्रामीण 26) तालुक्यातील 199, अलिबाग 22, माणगाव 16, खालापूर 12, कर्जत व मुरूड प्रत्येकी 10, पेण आठ, उरण व …

Read More »

माथेरान पर्यटकांनी गजबजले; स्थानिक सुखावले

कर्जत : बातमीदार तब्बल साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर 2 सप्टेंबर रोजी माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आणि पर्यटकांची पावले माथेरानकडे पुन्हा वळू लागली. रविवारी (दि. 4) सुटीच्या दिवशी हे पर्यटनस्थळ गजबजल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगेत असलेले टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. …

Read More »

आजपासून हॉटेल, बार होणार खुले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अनलॉक-5च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सोमवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी सरकारने नियमावलीही लागू केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस (एफ अ‍ॅण्ड बी) युनिटस्, आऊटलेटस्, हॉटेल, …

Read More »

‘मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही’

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम जनतेला राज्य सरकार आणखी किती दिवस खडतर प्रवासासह वेळ व पैशाचा अधिक भूर्दंड देणार, असा सवाल केला जात आहे. कोरोनामुळे केवळ अत्यावश्यक सेवांसाठी काम करणार्‍यांना …

Read More »

दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार; राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग होणार सुरू

अमरावती : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय व खासगी शाळा-महाविद्यालये बंद आहेत, परंतु दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये मात्र …

Read More »

काँग्रेस दलालांचा दलाल; कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

पणजी : वृत्तसंस्था कृषी कायद्यांना विरोध करणारा काँग्रेस पक्ष दलालांचा दलाल असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी जावडेकर गोव्यात आले होते. त्यांनी रविवारी (दि. 4) पर्वरी येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थन …

Read More »

कोरोना नियंत्रणासाठी सरकार कार्यरत; जुलै 2021पर्यंत 25 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार 24 तास काम करीत असून, जुलै 2021पर्यंत देशातील 25 कोटी लोकांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी (दि. 4) दिली. ते संडे संवाद या कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण जगात कोरोनाचे संकट वाढत असताना यावरील …

Read More »

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चुकीमुळे आई व बाळाचा मृत्यू

कर्जत : बातमीदार नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तेथील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे नेरळ जवळील पिंपळोली गावात माहेरवासीण असलेल्या महिलेला बाळंतपणानंतर आपला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमवावे लागले आहे. पूनम राजेंद्र रुठे या गरोदर असल्याने त्यांना पहिल्या गरोदरपणासाठी पिंपळोली या गावी माहेरी आणण्यात आले होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन तपासणी …

Read More »

…तर चीनला धडा शिकविण्यासाठी भारतीय लष्कर तयार

नवी दिल्ली ः गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून भारतीय सीमेवर सातत्याने आगळीक केली जात असून, घुसखोरी करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले असले तरी सीमेवरील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत, मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने …

Read More »

विक्रांत पाटील यांनी घेतली गोव्याच्या भाजयुमो प्रदेशाध्यक्षांची भेट

पनवेल : वार्ताहर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे सध्या महाराष्ट्र दौर्‍यावर असून या दौर्‍या दरम्यान त्यांनी गोव्याचे भाजयुमो प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी भाजयुमो वाढविण्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद सावंत यांनी युवामोर्चातील आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच …

Read More »