नागोठणे ः प्रतिनिधी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातसुद्धा ही आरोग्य मोहीम राबविली जात आहे. याचा जास्तीत जास्त प्रसार होऊन रायगड जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्ह्यात नावाजलेल्या व्यक्तींकडून या संदर्भात आवाहन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने नागोठणे येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा …
Read More »गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना हफ्ते भरण्यास मुदतवाढ
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 2018मधील गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास 28 डिसेंबर 2020पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. कोविड-19 व त्या अनुषंगाने सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या 2018मधील गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी नवी …
Read More »अनधिकृतपणे मासेमारी करणार्या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी
पनवेल ः प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवर अनधिकृतपणे परप्रांतीय मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर करून सुरू असलेल्या मासेमारीला आळा घालण्यासाठी अशा बोटींवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या पदाधिकार्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली. समुद्र किनारपट्टीपासून 12 नॉटिकल प्रदेश स्थानिक मच्छीमारांसाठी …
Read More »बिमा पाठशाला अॅप एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे
पनवेल ः वार्ताहर शिक्षा सुरक्षा फाऊंडेशनच्या बिमा पाठशाला या अभिनव अॅपचे लाँचिंग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिवली येथे झाले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रेरणेने प्रत्येकाने विमा विषयात आत्मनिर्भर व्हावे या हेतूने या उपक्रमाची …
Read More »पोलीस कर्मचार्यांची अँटिजेन चाचणी
कळंबोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत आपल्या सहकारी बंधू-भगिनींच्या जीवाचे संरक्षण करताना कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या प्रयत्नातून मंगळवारी (दि. 29) सर्व कर्मचार्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांकडून कुटुंबप्रमुख सतीश गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोणत्याही सहकार्याला त्रास होऊ नये म्हणून …
Read More »युवा मोर्चाची जिल्हा आढावा बैठक
धाटाव ः प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण व सहप्रभारी अॅड. ॠषीकेश जोशी तसेच जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा आढावा आणि पुनर्रचना बैठक कोलाड येथे झाली. युवा मोर्चाच्या पुनर्बांधणीसाठी तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या कामाचा …
Read More »प्रश्न लाखोंच्या रोजगाराचा
कोरोनाच्या आघाडीवर देशातील परिस्थिती काहिशी अधिक नियंत्रणात येत आहे असे राष्ट्रीय पातळीवरील ताज्या आकडेवारीवरून दिसते. त्यामुळेच ऑक्टोबरपासून सुरू व्हावयाच्या नव्या अनलॉक 5 बद्दल लोकांच्या मनात बर्याच अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात नव्या नियमावलीसह हॉटेल्स पुन्हा पूर्ववत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याचेही समजते. अर्थात येत्या महिन्यापासून सुरू होणार्या सणासुदीच्या हंगामामुळे खबरदारीही अधिक …
Read More »पिकेल ते विकेल योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी राज्य शासनाने पिकेल ते विकेल ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ पेण मतदारसंघातील शेतकरी व आदिवासी बांधवांना मिळावा तसेच या योजनेची माहिती त्यांना मिळावी यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून …
Read More »पनवेल तालुक्यात 274 नवे कोरोनाबाधित
तिघांचा मृत्यू 239 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 29) कोरोनाचे 274 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 239 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 208 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 185 रुग्ण बरे …
Read More »ठाकूरवाडी-पिरवाडीत मेडिकल कॅम्प
उरण : प्रतिनिधी मेडिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी असलेल्या ठाकूरवाडी-पिरवाडी येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पमध्ये मास्क, व्हिटॅमिन सी, अॅनर्जी पावडर आदींचे वाटप करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे, उरण मेडिकल वेल्फेअर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper