कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीत नारळेवाडीत एका गोटफार्ममधून 3750 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 12) ही कारवाई केली. या रक्तचंदनाची किंमत सुमारे एक कोटी 80 लाख रुपये असून, या प्रकरणी गोटफार्मच्या मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझर; रुग्णांना फळवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांनी त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. यानिमित्त पोलिसांना मास्क व सॅनिटायझर, तर रुग्णांना फळवाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी गरीब व गरजूंना जीवनावश्यक …
Read More »…तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?; ‘रोखठोक’ला संदीप देशपांडेंचे ‘मनसे’ उत्तर
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, असे म्हणत शिवसेना नेते तथा दै. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्याला राज यांनी उत्तर दिलेले नाही, मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून …
Read More »कायद्याचे राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचे?; भाजपचा शिवसेनेला टोला
मुंबई : प्रतिनिधी वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसावर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकार्याला मारहाण… पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असा सवालवजा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. …
Read More »जय श्रीराम पतसंस्थेकडून वृक्षारोपण
मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात 1980 मध्ये लागवड केलेली उंचच उंच सुरूची झाडे उन्मळून पडली असून या उजाड जागी स्वच्छता करून जय श्रीराम नागरी पतसंस्था, मुरूडतर्फे 100 सुरूच्या वृक्षांची नुकतीच लागवड करण्यात आली. या वेळी पतसंस्थेचे चेअरमन अॅड. मोहन तांबडकर, व्हा. चेअरमन दिलीप जोशी, संचालक नंदकुमार जोशी, प्रकाश पंड्या, एम. …
Read More »स्व. संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याबद्दल पत्रकारांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबद्दल पनवेलमधील पत्रकारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी (दि. 13) भेट घेऊन त्यांचे आभार मानले तसेच या वेळी दिवंगत संतोष …
Read More »आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक रविवारी (दि. 13) पनवेल येथे झाली. या बैठकीत विविध ठराव करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे सांगत या आरक्षणाच्या …
Read More »नुकसानभरपाई न मिळाल्यास टपरीधारक करणार आंदोलन
मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात मुरूड शहरातील 44 टपरीधारकांचे अतोनात नुकसान झाले होते. मुरुड नगरपरिषदेकडून नुकसानीचे रीतसर पंचनामे करून तहसील कार्यालय मुरूडला सुपूर्द करण्यात आले होते, परंतु तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जाऊन सुद्धा नुकसानीची रक्कम प्राप्त न झाल्याने सर्व टपरी धारक आक्रमक झाले आहेत. तसेच समाजसेवक अरविंद गायकर यांच्या 16 …
Read More »नागोठण्यात महाडची पुनरावृत्ती टाळावी; ग्रामपंचायतीला विनंती
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे येथे आठ-दहा वर्षांपासून चालू असलेल्या एका इमारतीचे काम पूर्णच झाले नसले तरी संंधित इमारतीच्या भिंती ढासळायला सुरुवात झाली आहे. तशी तक्रार इमारतीचे शेजारच्या घरात राहणार्या रऊफ चिपळूणकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. महाडच्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नसून संंधित बिल्डरला तशी समज द्यावी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper