Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘दहावी, बारावी परीक्षेचा निकाल याच महिन्यात’

हिंगोली : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 10) माहिती दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना सांगितले. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने …

Read More »

कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलावा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे औद्योगिक क्षेत्रासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील कंत्राटी व कायमस्वरुपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी सूचनावजा मागणी केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे.या निवेदनात …

Read More »

पनवेलमध्ये सिडकोने कोविड रुग्णालय तयार करून द्यावे

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल आणि उरण परिसरात कोरोनाग्रस्त वाढत आहेत. त्यामुळे उपलब्ध रुग्णालय रुग्णांवर उपचार करण्याकरता कमी पडत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुलुंडच्या धर्तीवर पनवेल परिसरात सिडकोने कोविड रुग्णालय तयार करून द्यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात नगरविकास सचिवांकडे पाठपुरावा केला …

Read More »

उरणमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढविला

उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असणार्‍या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी आणखीन वाढविण्याचा निर्णय उरणच्या प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 13 ते 16 जुलै असा  लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. साथरोग अधिनियमन 1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपती व्यवस्थापन अधिनियमन 2005 च्या सर्व संबंधीत तरतुदीसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा …

Read More »

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा; नगरसेविका सीता पाटील यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाची साखळी तुटावी याकरीता पनवेल महापालिकेने दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले आहे. यादरम्यान भाजीपाला किराणा दुकानांमध्ये काऊंटर सेल सुद्धा बंद करण्यात आला आहे. मात्र असे असताना खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोलीत भाजीवाले व काही किराणा दुकानदार सरळ सरळ विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

पनवेल तालुक्यात 226 नवीन रुग्ण; चौघांचा मृत्यू; 125 रुग्ण बरे

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 11) कोरोनाचे 226  नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू  झाला आहे तर 125  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 181  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची  नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 97 रूग्ण बरे झाल्याने …

Read More »

गैरप्रकारांना आळा हवाच

कोरोना या घातक विषाणूचा फैलाव जसजसा वाढत गेला आणि या महामारीत मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते हे स्पष्ट झाले तसतशी कोरोनाची भीती फैलावाइतकीच झपाट्याने वाढत गेली आहे. या भीतीच्याच जोरावर काही नफेखोर सर्वसामान्यांना कोंडीत पकडून त्यांची नाना तर्‍हेने आर्थिक लुटमार करीत आहेत. खाजगी हॉस्पिटलांकडून रुग्णांची केली जाणारी लूट आणि औषधांचा …

Read More »

पॅनेसिया हॉस्पिटलची कोविड-19 मान्यता रद्द

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटलची कोविड रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारणी केल्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोविड -19 रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. रुग्णांकडून तक्रारी आल्यावर सूचना देऊनही व्यवस्थापनाने बदल न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून …

Read More »

कोरोनामुळे अश्वत्थामा कट्टा शांत

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचा कट्टा म्हणजे त्यांचे विरंगुळा केंद्रच पण सामाजिक आणि वैयक्तिकसमस्या सोडवण्याचे हे ठिकाण आज कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शांत झाले. आता रस्त्यावरील बेघरांचे आश्रय स्थान बनलेले दिसते.    अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे हे रोहा तालुक्यातील चणेरे …

Read More »

ग्रामीण भागात वल्गनीचे मासे पकडण्यासाठी धावपळ

पनवेल : वार्ताहर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील तरूण वर्ग हा घरीच असल्याने त्यांचे लक्ष आता वल्गनीचे मासे पकडण्याकडे लागले आहे. मोठ्या प्रमाणात या दमदार पावसात हे मासे पकडण्यासाठी तरूण वर्ग ग्रामीण भागातील नदीकिनारी, ओव्हळ, नाले, शेती क्षेत्राच्या रस्त्यावर दिसत आहेत. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकजण हा आपआपल्या …

Read More »