दोघांचा मृत्यू; 157 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाचे 223 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका 169 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 119 रूग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये …
Read More »पिण्याच्या पाण्यात आढळले किडे
खोपोली : प्रतिनिधी – नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावात पालिकेतर्फे पुरविण्यात येणार्या पिण्याच्या पाण्यात किडे व सांडपाणी आढळल्याने ग्रामस्थात तीव्र संतापाची लाट उसळली. पाणीपुरवठ्याचा गलथान कारभाराबाबत गावात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नगरपालिका प्रभाग क्र. 1 मध्ये अनेक दिवसांपासून पाण्याच्या कमी दाबामुळे अनेक रहिवाशांना पाण्यापासून वंचित रहावे लागत होते. त्यानंतर पाण्याच्या कमी दाबामुळे …
Read More »माणगाव तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी शर्मिला सत्वे
माणगाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या आदेशाने भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी महिला कार्यकर्त्या शर्मिला सत्वे यांची भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचे अभिनंदन केले. हा नियुक्ती कार्यक्रम शुक्रवारी (दि.10) मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात सुरक्षित अंतर ठेवून झाला. शर्मिला …
Read More »व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णांचे हाल पनवेल : वार्ताहर – पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. दरम्यान त्यामध्ये काहींना अगोदरच इतर आजार असल्याने त्यांना अधिक त्रास होतो. तसेच वयोवृद्ध रुग्णांची सुद्धा संख्या मोठी आहे. त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असते. राज्य शासन आणि स्थानिक …
Read More »असे होते बाजारातील संधीचे सोने !
कोरोना साथीमुळे घबराट पसरली तेव्हा बाजारात खरेदी करणार्यांच्या संधीचे सोने झाले आहे. अशी संधी फार दुर्मिळ असते, ती घेण्यासाठी धाडस मात्र हवे. When everybody is greedy, be fearful and when everybody is fearful, be greedy. जेंव्हा बाजारात प्रत्येकजण तेजीबद्दल बोलू लागतो तेंव्हा आपण अशा गोष्टीचा धसका घ्यावयास हवा आणि जेंव्हा …
Read More »‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती!
कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे अर्थचक्र तुलनेने लवकर सुरु होऊ शकेल, अशी सर्व चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जीवनपद्धतीचे पालन, एक देश आणि समाजाने याकाळात दाखविलेले सामंजस्य, शेतीमुळे ग्रामीण भागात व्यवहारांना आलेली गती आणि सरकारी व्यवस्थेने केलेले व्यापक प्रयत्न, यामुळे हे शक्य होते आहे. कोरोना साथीमुळे जगाचे व्यवहार …
Read More »चिंताजनक! रायगडात 11 कोरोनाबळी; 430 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाने नवा उच्चांक नोंदवत 11 बळी घेतले असून, 430 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 10) झाली. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील चार (महापालिका हद्द व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन), पेण दोन आणि उरण, खालापूर, कर्जत, म्हसळा व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल …
Read More »कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू
पोलादपूर : प्रतिनिधीकशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी (दि. 10) दुसर्या दिवशीही ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या दरम्यान मातीचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर 18 तासांनी महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले.मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ गुरुवारी रात्री 8च्या …
Read More »कुख्यात गुंड विकास दुबेचा यूपीत एन्काऊंटर
दोन पोलीस कर्मचारीही जखमी लखनऊ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणार्या कुख्यात गुंड विकास दुबे याचा शुक्रवारी (दि. 10) सकाळी विशेष पोलीस पथकाने एन्काऊंटर केला. अपघातानंतर पळून जात असताना पोलिसांनी त्याचा खात्मा केला.मध्य प्रदेशमध्ये अटक केल्यानंतर पोलीस पथक दुबेला कानपूरला घेऊन येत असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. …
Read More »दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात रिपाइंचा राज्यव्यापी एल्गार
11 जुलैचे आंदोलन यशस्वी करा : जगदीश गायकवाड पाली : प्रतिनिधीराज्यात दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जुलै रोजी रमाबाईनगर हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सर्वांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper