पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्याच्या प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा व ओबीसी आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा निर्णय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती, नवी मुंबईच्या बैठकीत सोमवारी (दि.20) घेण्यात आला. लोकनेते दि.बा. पाटील …
Read More »विचुंबे येथील शेकापचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलजवळील विचुंबे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीनंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी (दि.20) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. …
Read More »विश्वविजय एक पावलावर…!
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली, तर दुसर्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करीत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. आता रविवारी यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकासाठी निर्णायक संग्राम होईल… मायदेशी होत असलेल्या एकदिवसीय प्रारूपातील विश्वचषक स्पर्धेत भारतीय …
Read More »मल्टिप्लेक्सच्या पडद्यावरचं ‘लाईव्ह क्रिकेट’ पैसा वसूल पिक्चर
आजच्या विश्वचषक क्रिकेट अंतिम सामन्याची तिकीटे ऑनलाईन तिकीट बुक करा आणि मल्टिप्लेक्सच्या भल्या मोठ्या पडदाभर आजचा क्रिकेट सामना लाईव्ह एन्जॉय करा ही कल्पना नव्हे; हा तर रियॅलिटी शो आहे. कदाचित स्टेडियमवरचा उत्स्फूर्त फिल गुड येणार नाही, पण फुल्ल वातानुकूलित मल्टिप्लेक्समधील स्क्रीनवर ’हाऊसफुल्ल गर्दी’त प्रत्येक चेंडूवरची घडामोड छान अनुभवता येईल आणि …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 29 नोव्हेंबरला कर्जतमध्ये सभा
कर्जत : प्रतिनिधी कर्जत विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार सभा 29 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथील पोलीस परेड मैदानावर होणार आहे. त्याआधी कर्जत येथे उभारण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे …
Read More »नारपोली ते रसायनी रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ
आमदार महेश बालदी यांनी शक्य करून दाखवले पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोन-सावळे मार्गावरील उर्वरित नारपोली ते रसायनी टप्प्यातील काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोन-सावळे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत …
Read More »नवी मुंबईत पहिली मेट्रो धावली!
सेंट्रल पार्क नावामध्ये मुर्बी गावाचा उल्लेख असलेला फलक ग्रामस्थांनी लावला नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मेट्रोसेवा अखेर सुरू झाली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता येथील मेट्रोसेवा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) बेलापूर …
Read More »दुर्दैवी राडा
स्वर्गीय बाळासाहेबांच्या अकराव्या स्मृतिदिनी त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांची शिकवण यांचे स्मरण व्हायला हवे होते, परंतु दुर्दैवाने याच्या अगदी उलट घडले. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जो धिंगाणा घातला, तो निंदनीय होता. महाराष्ट्राचे दैवत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाला खरे तर राज्यभर काही …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये
ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी …
Read More »स्व. रामजी बेरा यांच्यावर अंत्यसंस्कार
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहिली श्रद्धांजली पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे खारघरमधील माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सेक्टर 14 येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत गुरुवारी (दि. 16) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper