Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोकणवासीयांना पाठबळ द्या

विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी पोलादपूर, अलिबाग ः प्रतिनिधी कोकणाला राज्य सरकारने सापत्नपणाची वागणूक दिली आहे. त्यामुळे आज कोकणावर संकट ओढवल्यामुळे जो धक्का बसला आहे त्याकडे राज्य सरकारने पाठ दाखवली तर कोकणची जनता कोणालाही माफ करणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणाला उभारी देण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत …

Read More »

छात्रभारतीकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात आलेल्या महामारीमुळे मजुरांचे व गरीब कुटुंबीयांचे हाल होत आहेत. लॉकडाऊन काळात आर्थिक आवकच बंद झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता त्यांना सतावत होती. या वेळी छात्रभारतीने पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत रसायनी, खालापूर, पनवेल तालुक्यातील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. …

Read More »

रक्तदान शिबिरास प्रतिसाद; 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मोहोपाडा ः प्रतिनिधी पत्रकार उत्कर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. अभिजित सुरते रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या सहकार्याने पेठगाव कोलखे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जवळपास 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू र्त प्रतिसाद दिला.  या वेळी समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, आयोजक अ‍ॅड. अभिजित …

Read More »

पनवेल ः तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वेळी भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच नामदेव पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचीही भेट घेतली. दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, संतोष पाटील सोबत होते, तर केणी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या गरीब …

Read More »

वाढदिवसानिमित्त महापौर सहाय्यता निधीस मदत; फकीर चांद शेखने जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फकीर चांद शेख याने आपल्या 15व्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या पिगी बँकेत जमा झालेले पाच हजार 900 रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत जमा करून समाजाप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत त्याने हे पैसे जमा केले. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे कोरोना रुग्णांना …

Read More »

उत्पादन शुल्क विभागाकडून गरजूंना मदत

पनवेल ः बातमीदार पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी तळा येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. घरांचे छप्पर उडल्याने नागरिकांना घरविना राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित …

Read More »

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा सज्ज

नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकर्‍यांचा शेतमाल बांधावरच नाश पावतोय. त्याला उठाव नाही. अशा परिस्थितीत शेतकरी उभा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नवी मुंबईतील यूथ कौन्सिल नेरूळच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मदतीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांच्या शेतमालास वाजवी भाव मिळावा आणि नागरिकांनाही योग्य दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध …

Read More »

कोरोनाबाधितांचा अधिवास विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यातील विचुंबे, उसर्ली खुर्द, मौजे वावंजे, सुकापूर आणि उलवे येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.  विचुंबे, येथील कोरोना रुग्ण राहत असलेली ओमकार पार्क-1 बिल्डिंग, उसर्ली खुर्द येथील निळकंठ फेज-1 बिल्डिंग, ओ विंग …

Read More »

वाइन शॉपवाल्यांचा झोल; चढ्या भावाने मद्यविक्री; शासनाच्या आदेशाला बगल

पनवेल ः वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद केली होती. परिणामी शासकीय महसुलात प्रचंड तूट होत असल्याने अखेर शासनाने कर प्राप्तीसाठी महसूल मिळणारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात मद्यविक्री ऑनलाइन किंवा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजद्वारे घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली, …

Read More »