Breaking News

महत्वाच्या बातम्या

ते स्टार आंदोलक सध्या काय करतात?

युध्दात सगळे माफ असते असे म्हणून काही गोष्टी कोरोनाच्या या युध्दात सोडून देऊन किंवा माफ करून चालणार नाहीत. कारण हीच ती वेळ आहे, खरे चेहरे दिसण्याची आणि दाखवण्याची. कोण ढोंगी आणि कोण खरा लढवय्या हे उघड करण्याची, आणि होण्याची. नाहीतर या युध्दातून आपण काहीच शिकलो नाही असे होईल. युध्द संपल्यावर …

Read More »

माथेरानमधील तीन रुग्णांची कोरोनावर मात; नागरिकांकडून स्वागत

माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरानमधील कोरोनाची बाधा असल्याचे अहवाल मिळालेले तीन रुग्ण रविवारी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन माथेरानमध्ये परतल्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.  माथेरानमध्ये 19 मे रोजी इथेच एका हॉटेलमध्ये काम करणारे दांपत्यांपैकी एकाला कोरोनाची लागण दिसून आली होती आणि त्यात एक महिला पोजिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात संपूर्ण घबराट …

Read More »

कर्नाळ्यात तिबोटी खंड्या ठरतोय आकर्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात तिबोटी खंड्या (ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर) पक्ष्यांच्या जोडीचे आगमन झाले असून अभयारण्यातील हे मुख्य आकर्षण ठरत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे अभयारण्य बंद असल्याकारणाने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना या पक्ष्याचे दर्शन घेता येणार नाही. पावसाची चाहूल लागल्यानंतर साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या …

Read More »

नवी मुंबईत आढळले 115 कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी (दि. 7) कोरोनाचे 115 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 41 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. रविवारी एकाचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 89  झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 886 व्यक्ती पॉझिटिव्ह असून; बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …

Read More »

आमदार महेश बालदी यांना पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन

उरण : वार्ताहर उरण तालुका भाजप महिला अध्यक्षा अ‍ॅड. राणी म्हात्रे यांनी उरण पूर्व विभागातील पदाधिकारी यांच्यासह आमदार महेश बालदी यांची शनिवारी (दि. 6) भेट घेतली. या वेळी त्यांनी उरण पूर्व विभाग आठ गाव पाणी प्रश्नाबाबत चर्चा करून निवेदन दिले.  म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनाडे धरणातील लिकेज …

Read More »

दिघोडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उर्मिला कोळी यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतमध्ये भाजप, शेकाप, शिवसेना परिवर्तन आघाडीची सत्ता आहे. यामध्ये परिवर्तन आघाडीचे थेट सरपंच व सहा सदस्य काँग्रेस तीन, असे पक्ष बलाबल आहे. उपसरपंचपदी असलेल्या  शारदा प्रल्हाद कासकर यांचा उपसरपंच पदाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी उर्मिला नरेश कोळी यांचा …

Read More »

पनवेल तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह

दोघांचा मृत्यू; दिवसभरात 50 जण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 7) कोरानाचे 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 50 जणांची कोरोनावर मात तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 19 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी तीन नवीन …

Read More »

चक्रीवादळग्रस्तांचे हाल

निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसून पाच दिवस झाले. वादळ केव्हाच गेले, मात्र नुकसानग्रस्तांचे हाल कायम आहेत. काही तास घोंघावलेल्या वादळी पावसाने अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: दक्षिण रायगडला याचा जबर फटका बसला. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेले जिल्हावासी या नव्या संकटामुळे …

Read More »

अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

नवीन पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 येथे आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले. या वेळी नागरिकांशी संवाद साधून व औषधाबद्दलची माहिती देऊन …

Read More »

खारघरमधील वटवृक्षाचे पुनर्रोपण

नगरसेविका नेत्रा पाटील यांनी केली अनोखी वटपौर्णिमा पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिन त्याचबरोबर वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी केली. निसर्ग चक्रीवादळाने खारघरमधील वटवृक्षाचे झाड उन्मळून पडले होते. वटपौर्णिमेला या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करुन त्यांनी वटपौर्णिमा साजरी केली. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिक कौतुक करीत …

Read More »