उरण : बातमीदार उरण मोरा येथील पोलिसाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या पत्नीलाही संसर्ग झाला होता. आता त्यांच्या 11 वर्षीय मुलीचाही कोरोना रिपोर्ट रविवारी (दि. 3) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सात झाली आहे. उरण तालुक्यात चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन उरलेला एक जणही …
Read More »रोहे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण
रोहे : प्रतिनिधी येथील कुंडलिका नदीपात्रात बुडणार्या एका महिलेचा जीव रोहे पोलिसांनी वाचविल्याची घटना रविवारी (दि. 3) सकाळी घडली. या तत्परतेबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. कुंडलिका नदीपात्रात एक महिला बुडत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले तुषार पारवे, मनीष ठाकूर व सुनील पाटील या नाईक दर्जाच्या तिघांनी …
Read More »अवैध दारू हातभट्टीवर नेरळ पोलिसांची कारवाई
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या हद्दीत असलेल्या गावठी दारूची भट्टी नेरळ पोलिसांनी उद्ध्वस्त केली.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत तिसर्यांदा नेरळ पोलिसांनी धाड टाकून अशी कारवाई केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी(दि. 2) सायंकाळी 8च्या सुमारास बेकरे येथील दोन जणांनी संगनमताने नागर खिंडीतील जंगल भागात गावठी दारू …
Read More »‘आयएफएससी’वरून आज गळे काढणार्यांनी पूर्वी काय केले? भाजप नेते आशिष शेलारांचा खडा सवाल
मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) हलविण्यासंबंधीच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आज गळे काढणार्यांनी 2007 ते 2014 दरम्यान काय केले? आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता. आता तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात. नुसता शिमगा करू नका. केंद्राला …
Read More »पनवेल तालुक्यात सहा नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागात तीन असे तालुक्यात एकूण सहा पॉझिटिव्ह रुग्ण रविवारी (दि. 3) आढळले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या 93, तर तालुक्यातील 110 झाली आहे. आजच्या महापालिका क्षेत्रातील रुग्णांमध्ये तिसर्यांदा गोवंडी (मुंबई) येथील यूएसव्ही फार्मा कंपनीतील कामगाराचा समावेश असल्याने या कंपनीत निर्जंतुकीकरण …
Read More »राज्यात लॉकडाऊन शिथिल
मुंबई : प्रतिनिधी मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टँड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले की, कोविड-19संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत ते म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये …
Read More »शुभ वर्तमान! 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण बरे
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करताना भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्यासाठी आता अधिक काळ लागत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळे मरणार्यांचा दर जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. गेले 14 दिवस देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 10.5 एवढा …
Read More »कर्जत येथे रक्तदान शिबिर
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 144 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 6 एप्रिलला नेरळ येथे रक्तदान शिबिर …
Read More »तळोजा, कानपोली, वलपमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटात देशसह राज्यात लॉकडाऊन केल्याने आदिवासी, झोपडपट्टावासी, निराधार महिला व गोरगरीबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा पाटील सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून भाजपचे नेते कूष्णा पाटील यांनी 150 गरजू कुटुंबाना महिनाभराचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणा-याना आदिवासी …
Read More »कोरोना योध्दे शिक्षकांना विमा संरक्षण द्या
शिक्षक परिषदेची शासनाकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत असंख्य योध्दे या जीवघेण्या विषाणूशी लढा देत आहेत. मात्र ग्रामीण भागात यात महत्वाची भूमिका बजावणारा प्राथमिक शिक्षकांसारखा घटक दुर्लक्षित राहिला आहे. इतर घटकांप्रमाणे शिक्षकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी आता पुढे येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शासनाकडे आग्रह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper