अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत बुधवारी (दि. 29) अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शासकीय व खासगी मालमत्तेसह पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्य शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे. कोरोना विषाणूमुळे आधीच मोठे संकट उभे राहिले असताना बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वार्यासह पर्जन्यवृष्टी झाली. …
Read More »होमगार्डशी हुज्जत; गुन्हा दाखल
रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशानुसार साळाव चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डशी मोटरसायकलस्वाराने हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. होमगार्डने मोटरसायकलस्वाराकडे कुठे चाललास, अशी विचारणा केली असता उद्धट वर्तन व बाचाबाची करून बघून घेण्याची धमकी देणार्या व्यक्तीविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
Read More »वनखाते, सर्पमित्रांकडून सापांना जीवदान
पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात प्रशासकीय कार्यालय आपापल्या परीने जबाबदारी पार पाडत असतानाच वन विभागासारख्या महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्यांसह पेणमधील सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी काही सापांना जीवदान देऊन त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडले आहे. वाढते शहरीकरण तसेच दिवसेंदिवस उभारण्यात येत असलेल्या सिमेंटच्या जंगलांमुळे सापांचा निवारा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे हे साप …
Read More »‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणार्या अधिकारी-कर्मचार्यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी पाहता आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर शुकशुकाट
श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे ओस पडले असून येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी पर्यटन व्यवसायाशी निगडित असणारे घटक, हॉटेल व रिसॉर्ट मालकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे धंदा होईल अशी परिस्थिती नाही. …
Read More »वीजग्राहकांसाठी चेक ड्रॉप बॉक्स
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील वीजग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी विशेष उपाय योजना केली आहे. वीजग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी नवीन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी …
Read More »नागोठण्यात वादळी पावसाचे थैमान
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असतानाच बुधवारी (दि. 29) सायंकाळी सोसाट्याच्या वादळी वार्यासह पावसाने शहरात प्रवेश केल्याने सर्व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळी पावसाने शहरातील सर्वच भागांत नुकसान केले असून यादरम्यान खंडित झालेला विद्युत पुरवठा गुरुवारी दुपारनंतर शहरातील काही भागात पूर्ववत करण्यात विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना यश …
Read More »जिल्हाधिकार्यांकडून उरणची पाहणी
उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्याचा बुधवारी (दि. 29) धावता दौरा केला. कोरोनाबाबत या वेळी उरण येथील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांनी या संदर्भात काही सूचना आणि मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोनापासून दक्षता घ्या, खबरदारी घ्या, नागरिकांचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निराधार महिला, आदिवासी बांधवांना मदत
कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. हातावर पोट असणार्या गरीब, गरजू, निराधार महिला व आदिवासींची उपासमार होत आहे. अशा पडघे, तळोजा औद्योगिक विभागातील 200 महिला व आदिवासींना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजपचे …
Read More »कर्जत पंचायत समितीकडून पाणीटंचाईग्रस्त भागांची पाहणी
टँकर व्यवस्थेची कार्यवाही सुरू कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. तालुक्यात 57 आदिवासी वाड्या आणि 24 गावे पाणीटंचाईग्रस्त असून सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मे महिना सुरू होत असताना पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper