पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. महापालिका क्षेत्रात दोन आणि ग्रामीण भागात एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 58 रुग्ण झाले असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या 68 झाली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81वर पोहोचला आहे. …
Read More »पनवेल मनपा प्रभाग 20मध्येही मोदी भोजन कम्युनिटी किचन
गरीब, गरजूंना अन्नछत्राचा लाभ पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल शहर यांच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन ही संकल्पना महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व …
Read More »आशेचे किरण
कोरोनाच्या प्रादुर्भावाचे यशस्वी व्यवस्थापन करणार्या देशांकडे भारताचे चांगले लक्ष आहे. इतरांकडील परिस्थितीतून आपल्याला काही शिकता येईल का, आपल्याकडील परिस्थिती अधिक शिताफीने नियंत्रणात आणण्याकरिता त्याचा काही वापर करता येईल का, याकडे आपली सरकारी यंत्रणाही बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणूचे जवळपास अवघ्या जगभरात थैमान सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरू …
Read More »सुरक्षा रक्षकांना अन्नधान्याचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देशभर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातील संकटात सापडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कंपनीमध्ये अडकून पडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे प्रमुख राजेंद्र पाटील …
Read More »चिरनेर (ता. उरण) ः हायवे रोडवर बँक ऑफ महाराष्ट्र येथे बँकिंग कामासाठी परिसरातील नागरिक व महिलांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले. (छाया : जीवन केणी)
Read More »अंजुमन महाविद्यालयातर्फे अत्यावश्यक सेवा बजावणार्यांना मास्कचे वाटप
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील डीएलएलइ विभागातील मुलांनी 600 मास्क तयार करून सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले 600 मास्क लोकांसाठी कर्तव्य बजावणारे मुरूड पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय तसेच तहसील …
Read More »‘काळसेकर’मध्ये ऑनलाइन ’लर्न फ्रॉम होम’
पनवेल ः वार्ताहर अंजुमन-ए-इस्लाम शिक्षणसंस्थेचे एनबीए मानांकनप्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल लॉकडाऊनच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑनलाइन माध्यमातून अध्ययन-अध्यापनाचा अभिनव उपक्रम राबवत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मार्चच्या तिसर्या आठवड्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. काळसेकर पॉलिटेक्निकमधील विविध विभागांचा पदविका अभ्यासक्रम यादरम्यान 85 टक्के पूर्ण झाला …
Read More »बँकेचा सायरन वाजल्याने पोलिसांची धावपळ
पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रचा सायरन रविवारी दुपारी अचानक वाजल्याने पोलिसांची व नागरिकांची एकच धावपळ झाली. तांत्रिक बिघाडामुळे हा सायरन वाजल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. बँकेजवळच डीवायएसपी ऑफिस असल्याने डीवायएसपी नितीन जाधव यांनी त्वरित सायरन वाजल्याची दखल घेऊन पोलीस कर्मचार्यांना बँकेजवळ जाण्यास सांगितले. बर्याच वेळाने …
Read More »कलाकारांना मदतीचा हात
पनवेल ः वार्ताहर संपूर्ण विश्व कोरोना (कोविड-19) नावाच्या आजाराशी झुंज देत असताना पनवेल तालुक्यात संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पनवेल व रायगडमधील कलाकारांना धान्य आणि आर्थिक मदत करण्यात आली. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत कलाकारांचा विशेष सीझन असतो. त्यामध्ये कलाकार जे काही कमवतो त्यावर नोव्हेंबरपर्यंत आपले घर चालवतो. …
Read More »खोपोली शहर ठप्प; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद; 24 तास नाकाबंदी
खोपोली : प्रतिनिधी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून खोपोलीतील चार प्रभाग प्रशासन व पोलिसांकडून पूर्ण सील करण्यात आले असून, अन्य भागातील रहदारीही रोखण्यात आली आहे. ठरावीक औषधी दुकाने व काही दवाखाने सुरू असले तरी नागरिकांना होम क्वारंटाइन केले असल्याने संपूर्ण शहर सध्या ठप्प आहे. कोरोनाचा एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper