खोपोली ः प्रतिनिधी शहरातील सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे, मात्र खोपोली पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सुभाषनगर वसाहतीत अंदाजे 350 घरे असून या धोकादायक दरडीची पहाणी काही वर्षांपूर्वी भूगर्भ तज्ज्ञांनी पाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरडीखाली येणारी बाधित …
Read More »माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली
रात्रभर रस्ता बंद; 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊस नेरळ ः प्रतिनिधी हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस रेड अलर्ट दिलेला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरानमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका पुन्हा एकदा माथेरानच्या घाटरस्त्याला बसला …
Read More »पनवेल व उरण येथे 25 जुलैला होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त कोणत्याही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत …
Read More »खारघरमधून चार लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत;
दोन नायजेरियन व्यक्तींना अटक पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4 लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथे दोन विदेशी नागरिक अमली पदार्थ घेऊन …
Read More »खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू खोपोली, खालापूर,चौक ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत …
Read More »पावसाचा कहर!
पनवेल : वार्ताहर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान या …
Read More »पोलादपुरात 48 तासांत 500 मिमी पावसाची नोंद
पोलादपूरसह माटवण परिसरात पूरस्थिती; रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो; आंबेनळी घाटात दरड पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतचा विक्रमी पाऊस पडल्याची नोंदतहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 500 मिमी एवढी नोंद झाली आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये …
Read More »पनवेलकरांना मुसळधार पावसाने झोडपले
पनवेल : वार्ताहर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस …
Read More »कर्नाळा बँकेचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पुन्हा मांडला विधिमंडळात
उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक 17 ऑगस्ट 2021 रोजी अवसायनात घेतली आहे. अवसायन दिनांकास 51,624 ठेवीदारांच्या 553.32 कोटी रकमेच्या ठेवी आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर 38 हजार 639 ठेवीदारांना केंद्र सरकारच्या डीआयसीजीसी माध्यमातून आजपर्यंत 377.71 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. …
Read More »भाजपच्या उत्तर रायगड अध्यक्षपदी अविनाश कोळी, तर धैर्यशील पाटील दक्षिण जिल्हाध्यक्ष
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी (दि. 19) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. यामध्ये उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेलचे अविनाश कोळी, तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. अविनाश कोळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper