Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर

मुंबई : प्रतिनिधीकरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे, मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी …

Read More »

कोकणावर अन्याय करू नका!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सरकारला आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गसंपदा असलेल्या कोकणावर अन्याय करू नका, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आमदार ठाकूर यांनी कोकणाची बाजू समर्थपणे मांडत कोणत्याही परिस्थिती कोकणावर अन्याय होऊ नये, अशी रोखठोक भूमिका घेतली आणि कोकणाला …

Read More »

कबड्डी स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघ विजेता

कर्जत : बातमीदार कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने किरवली येथे न्यू बजरंग क्रीडा मंडळाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत त्यांना जय हनुमान मोहाली संघाचा पराभव केला. या स्पर्धेत नेरळ येथील जाणता राजा संघाने तृतीय, तर चौथा क्रमांक वदप येथील नेताजी …

Read More »

क्षुल्लक कारणावरून मुलाकडून आईची हत्या

महाड ः प्रतिनिधी आईने पुण्याला जाण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने आपल्या वृद्ध आईची क्रूरपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी महाड तालुक्यातील नागाव रेवतळे फाटा येथे घडली. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार …

Read More »

अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

पनवेल ः कोन येथे आयोजित अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी कोन ग्रामपंचायत सरपंच निलेश म्हात्रे, काशीनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, पांडुरंग घरत, भगवान शिसवे, प्रकाश शिसवे, नाथा म्हात्रे, हनुमान म्हात्रे, गणेश म्हात्रे, लक्ष्मण घरत, रामचंद्र …

Read More »

कार्ला येथील एकवीरा देवीची यात्रा रद्द

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असून संसर्ग टाळण्यासाठी भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून एकवीरा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. एकवीरा देवस्थान कार्ला येथील प्रशासकीय समितीने यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी गडावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. एकवीरा देवस्थान …

Read More »

महिला दिनानिमित्त व्याख्यानाला प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील आदर्श महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. 13)व्याख्यान तसेच मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होेते. हे कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमध्ये आदर्श महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून …

Read More »

‘सीएए’वरून राज्य सरकारची दुटप्पी भूमिका

देवेंद्र फडणवीस यांची टीका मुंबई ः प्रतिनिधी  एकीकडे पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री आपला पाठिंबा जाहीर करतात आणि दुसरीकडे राज्यात येताच त्यासाठी समिती गठीत करतात. याच सरकारमधील दोन मंत्री उमर खालिदच्या सभेला उपस्थित राहतात आणि त्यानंतरच दिल्लीत दंगे होतात आणि त्यावर काहीच कारवाई होत नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. भारतीय …

Read More »

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पनवेल मनपात शीघ्र कृतिदल

पनवेल ः वार्ताहर कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पनवेल महापालिकेत शीघ्र कृतिदलाची स्थापना करण्यात आली असून, कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे, तसेच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स सभेत देण्यात आलेल्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेत …

Read More »

पळस्पे उपसरपंच अजय तेजे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अजय अशोक तेजे यांची शुक्रवारी (दि. 13) बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. उपसरपंचपदाच्या निवडीवेळी सरपंच चंद्रकांत भोईर, भाजप पळस्पे विभायीय अध्यक्ष अनेश ढवळे, सदस्य दिनेश बेडेकर, अरुणा भोईर, सपना वारके, नीता भगत, रेखा दामोदरे, विजय गवंडी, ग्रामसेवक रा. …

Read More »