Breaking News

महत्वाच्या बातम्या

तिथीचा हट्ट सोडा, 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख घोषित करा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे साकडे मुंबई : प्रतिनिधीतिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी, असे आवाहन राज्यातील सत्तेत भागीदार असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची …

Read More »

क्षुल्लकीकरणाचे वारे

गेल्या काही वर्षांत राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. परंतु या घसरलेल्या पातळीचा संबंध भारतीय जनता पक्षाशी लावण्याचा ‘उद्योग’ काही लोक करू लागले आहेत. वास्तविक राजकारणाचे क्षुल्लकीकरण प्रामुख्याने कुणी केले असेल तर ते सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेसनेच. पंतप्रधान मोदी यांच्या उदयाने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या पुढार्‍यांनी गेली काही वर्षे इतक्या खालच्या पातळीवरील …

Read More »

रसायनीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मोहोपाडा : प्रतिनिधी : रसायनी डॉक्टर असोसिएशनच्या (प्रायमा) वतीने रिस येथील राजिप शाळेत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात शाळेतील 76 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच तज्ञ दंतचिकीत्सक, त्वचा स्पेशालिस्ट, नेत्ररोग, मेडीस्ट्रेशन, जनरल फिजिशन, बालरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना …

Read More »

सीकेटी’चे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुयश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : रायगड जिल्हा परिषद अलिबाग-शिक्षण विभागातर्फे हाळ-खोपोली येथील याक पब्लिक हायस्कूलमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित रायगड जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनात नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सुयश प्राप्त केले आहे. सीकेटी विद्यालयाने या …

Read More »

फुंडे कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

उरण : वार्ताहर : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विशेष श्रम संस्कार शिबिर वेश्वी येथे झाले. शिबिरात वेश्वी व दादरपाडा या दोन गावात स्वछता करून स्वच्छतेतून समृद्धीकडे चा संदेश दिला वेश्वी कातकरवाडी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या …

Read More »

महिला बचत गटांच्या वतीने वाकडीत विविध कार्यक्रम

भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल तालुक्यातील वाकडी येथील सर्व महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेचे भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 4) दर्शन घेतले. या वेळी विविध धार्मिक भजन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या महापूजेचे आयोजन शिवकन्या महिला बचत गट, …

Read More »

अवकाळी पाऊस, वादळामुळे मच्छीमार बांधव संकटात

खोल समुद्रातील मासळी गायब; राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी उरण : रामप्रहर वृत्त : समुद्रात वारंवार येणारी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे संकटात सापडलेला मच्छीमार अद्यापही यातून बाहेर येताना दिसत नाही. सध्या मासेमारीसाठी पोषक वातावरण असताना खोल समुद्रात जावूनही म्हणावी अशी मासळी मिळत नसल्याने मच्छीमार बांधव हवालदिल झाला आहे. मासेमारी करण्यासाठी लागणारा …

Read More »

पनवेलच्या मुली देशात भारी!

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पटकाविला द्वितीय क्रमांक पनवेल : रामप्रहर वृत्त : आपली कला सादर करणार्‍या स्पर्धकांमध्ये असलेली प्रचंड चुरस, एकाहून एक बहारदार नृत्याविष्कार आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषमय वातावरणात नागपूर येथे झालेल्या ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स स्पर्धेत पनवेल तालुक्यातील मुलींनी बाजी मारत द्वितीय क्रमांक मिळविला. …

Read More »

खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम

तीन वर्षांच्या मुलाचा तोडला लचका खालापूर : प्रतिनिधी खोपोलीतील सोमजाईवाडी येथे मंगळवारी (दि. 4) सकाळी तीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने लचका तोडला. श्रेयस गुरव असे बालकाचे नाव असून, कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूचे मांस निघाले आहे. या घटनेत सुदैवाने त्याचा डोळा वाचला आहे. खोपोली शहरात सध्या कुत्र्यांचा हैदोस …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांची उद्या जिल्हा परिषदेवर धडक

प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आंदोलनाचे हत्यार अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी गुरुवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आयटकशी संलग्न रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ऑनलाइन वेतन सुरू झाले आहे, मात्र …

Read More »