Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही’, उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाकडूनही संजय राऊतांचा निषेध

मुंबई : प्रतिनिधी ’छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची सातार्‍याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल’, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी करुन …

Read More »

बहुजन क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करा -उदय काठे

रेवदंडा : प्रतिनिधी बहुजन क्रांती मोर्चातर्फे 8 जानेवारी रोजी अलिबागमध्ये मोर्चा काढला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी  पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा भाजप चिटणीस उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल …

Read More »

अलिबागमध्ये अभिनव अभिवाचन स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकरांना  अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. या अभिवाचन स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. अलिबाग तालुका तसेच पुणे …

Read More »

नेरळ रेल्वे फाटकातील रस्त्यामधील लोखंडी सळया बाहेर

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशनच्या कर्जत बाजूकडे असलेल्या फाटकामधील  डांबरी रस्त्यामधून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्या सळया फाटकातून रूळ ओलांडणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चाकात घुसत असून त्या गाड्यांचे टायर निकामी ठरत असल्याचे सातत्याने घडत आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत सातत्याने आवाज उठवूनदेखील त्या …

Read More »

वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात बुधवारी (दि. 15) 31वा रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाहन चालविताना होणार्‍या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे …

Read More »

पनवेल : भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वतीने 2020 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, भाजप नेते राजू बनकर आदी उपस्थित होते.

Read More »

उलवे नोड येथे पोंगल सण जल्लोषात, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे तमीळ संगम व दिनकर यांच्या वतीने ‘पोंगल फेस्टिव्हल’चे उलवा नोड येथे बुधवारी (दि. 15) आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा सोहळा उलवे नोड येथील भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर आयोजित …

Read More »

उरणच्या फुंडे हायस्कूलमध्ये मकरसंक्रांतीचा सण उत्साहात

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे बुधवारी (दि. 15) मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘सण संक्रांतीचा मोठा, नाही आनंदाला तोटा,’ असा हा आनंददायी उत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ‘अ’च्या वर्गाने हा कार्यक्रम सादर केला. सकाळी शालेय परिपाठानंतर विद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

महिलांसाठी आज हेल्मेट बाइक रॅली

पनवेल : कलंबोळी वाहतूक शाखा येथे सर्व महिलांसाठी हेल्मेट बाइक रॅलीचे आयोजन गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. अधिकाधिक महिलांनी बाइक रॅलीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन कळंबोली वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी केले आहे. तसेच सहभागी महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी …

Read More »

ट्रकचोरट्यास अटक

पनवेल ः 13 लाख रुपये किमतीचा ट्रक चोरणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा ट्रक हस्तगत केला आहे. पनवेलजवळील भारत ढाब्यासमोर कान्होबा ढाब्याजवळ जेएनपीटी रोडलगत अशोक लेलॅण्ड कंपनीचा 12 टायर असलेला ट्रक क्र.एमएच-46-एएफ-2167 हा उभा करून …

Read More »