मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परीसरात शासकीय कार्यालय, सुख सोयीयुक्त पिल्लई इंटरनॅशनल महाविद्यालय, सेबी प्रकल्प, जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींमुळे रसायनी व परिसराचा नावलौकीक आहे. परंतु येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल …
Read More »‘चला हवा आली कामोठ्यात’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन
कामोठे : रामप्रहर वृत्त कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने 16 फेब्रुवारीला चला हवा आली कामोठ्यात या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) करण्यात आले. कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा …
Read More »पिंपळोली येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर
कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 10) पिंपळोली (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 150 हून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड नोंदणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रकांत निर्गुडा यांच्या हस्ते झाले. …
Read More »पेण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ
पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील कुंभारआळी (प्रभाग क्रमांक 1) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक का. रा. पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजप कोकण विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, हितेश पाटील, …
Read More »म्हसळ्यातील शिक्षकांनी घेतले केंद्र सरकारचे ‘निष्ठा‘चे धडे
म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणाना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लीश …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटांत हाणामारी
13 जणांवर गुन्हा दाखल पेण ़: प्रतिनिधी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील दोन व दुसर्या गटातील एक असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील पाच व …
Read More »आज नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव
नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री अय्यपा सेवा मंडळाच्या वतीने 23 वा अय्यपा महोत्सव आज रविवारी (दि. 12) साजरा करण्यात येत आहे. नागोठणे प्रभुआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर परिसरात कुनत्तूमना शशिकुमार नंबुद्री यांच्या हस्ते हा पूजा महोत्सव संपन्न होणार आहे. पहाटे पाच वाजता महागणपती होमाने या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला …
Read More »नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनार्थ आज खोपोलीत रॅली
खोपोली : प्रतिनिधी भारतीय संविधानातील सर्व संसदीय कार्यप्रणालीचा अवलंब करून बहुमताने नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाला. या कायद्याच्या जनजागृती व समर्थनार्थ जागरूक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 12) सकाळी 10 ते 12. 30 या दरम्यान खोपोलीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरूवात शहरातील फायर ब्रिगेड …
Read More »मुरूडमध्ये उलटी-जुलाबाची साथ
डोंगरीत 50पेक्षा जास्त रुग्ण; आंबोली, एकदरातही बाधा मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावांत दूषित पाण्यामुळे उलटी जुलाबाची साथ सुरु झाली असून, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून, रुग्णांची काळजी घेण्यात यंत्रणा व्यस्त झाली आहे. डोंगरी, आंबोली व एकदरा या …
Read More »पनवेलमध्ये भाजपचा डबल धमाका
महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांची बाजी पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे या भाजप, आरपीआय मित्रपक्षाच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत व अपेक्षित विजय मिळवत पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper