Breaking News

महत्वाच्या बातम्या

बारवई यात्रा उत्साहात

मोहोपाडा ः वार्ताहर कार्तिकी एकादशीनंतर येणार्‍या मोक्षदा एकादशीला पूर्वीपासून होणारी बारवई पोयंजे येथील डोंगरमाथ्यावर असणार्‍या विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्ह्यातील चौर्‍यांऐशी गावांची यात्रा मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यात्रेतील पाळणे, थाटलेली दुकाने आदीसह आनंद लुटण्यासाठी लहानग्यांसह तरुणाईंची मोठी गर्दी दिसून आली. बारवई गावची दीड दिवसाची यात्रा ही सर्वांना परिचित असून या …

Read More »

वक्तृत्व स्पर्धेत पूनम सिरसाट प्रथम

उरण ः वार्ताहर गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्यावतीने नावडे येथे आयोजित केलेल्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत येथील छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूनम सिरसाट (इ.10 वी अ) हिने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही कर्मवीरांचे वारसदार, या विषयावर पूनम सिरसाट हिने केलेल्या भाषणाने …

Read More »

अवैध दारू विक्री विरोधात कारवाईची गरज

उरण ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील खोपडी दारुकांड स्पिरिटकांड याचा इतिहास असताना या दोन्ही दारुकांडात जवळपास 100 हुन अधिक जणांचा बळी गेला होता. आजही रायगड जिल्ह्यासह उरणमधील अनेक गावांत गावठी दारू व देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असून दारुबंदी खाते व पोलीस खाते यांचे आर्थिक हितसबंध असल्याची माहिती मिळत आहे.   …

Read More »

खांदेश्वर व्यापारी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी खांदेश्वर व्यापारी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये खांदा कॉलनीच्या अध्यक्षपदी नगरसेवक एकनाथ गायकवाड व उपाध्यक्षपदी भास्कर वाय. शेट्टी यांची निवड करण्यात आली. तसेच असोसिएशनच्या नवीन कमिटीमध्ये सचिव बाबासाहेब ठोंबरे, उपसचिव कमलेश पटेल, खजिनदार सुभाष खोमणे, सहखजिनदार मावजी पटेल, सदस्य चनाराम चौधरी, देशमुख मॅडम, अंबावी पटेल, …

Read More »

रानसई आदिवासी वाड्यांवरील रस्त्याची चाळण

पादचारी व वाहनचालकांना करावी लागतेय कसरत खडी उखडलेल्या मार्गाने पायपीट; आदिवासींमध्ये संताप उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाड्यांवरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, पादचारी आणि लहानसहान वाहनचालकांची या रस्त्यातून जाताना कसोटी लागते. मागील चार वर्षांपूर्वी अन्वरशेठ शाबाजकार यांच्या फार्म हाऊसपासून ते खैरकटी वाडी, भुर्‍याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची …

Read More »

‘एकनाथ पांडुरंग हनुमंते’ एक धगधगते वादळ

निरपेक्ष कामाचा एक तारा अखेर निखळला नाथ पंढरी राहतो त्याप्रमाणे बुधवार 4 डिसेंबरला आपणा सर्वांमधला ’एक ऩाथ’ सर्वांना सोडून पंढरीला निघून गेला़ आणि सर्व हनुमंते परिवारासह अख्खा समाजच हळहळून गेला. नावाप्रमाणेच एक व्यक्तिमत्व. त्यांच्या नावातच सर्वकाही आहे. ’पांडुरंगाचा हा नाथ हनुमानाच्या ताकदीसारखा ़सर्वशक्तीनिशी करील सर्वांवर मात.’ त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने …

Read More »

डिझेल परताव्याची रक्कम न मिळाल्याने मच्छीमार त्रस्त

मच्छीमार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बैले यांचा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाकडून मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे मच्छीमार संतप्त झाले आहेत. डिझेल परताव्याची आमच्या हक्काची रक्कम तातडीने मिळावी, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. …

Read More »

कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मागील एक महिन्यापासून बंद असून त्याचा परिणाम येथील रुग्ण सेवेवर होत आहे. त्याचप्रमाणे येथे पुरेशा प्रमाणात औषधसाठा नसल्यामुळे रुग्णांना खासगी दुकानातून औषधे घ्यावी लागत  आहेत. या आरोग्य केंद्रात औषधसाठा तातडीने उपलब्ध करून द्यावा तसेच रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी मागणी कळंब …

Read More »

कर्जत-खोपोलीच्या प्रवाशांना पुन्हा प्रतीक्षा

कर्जत, खोपोली, नेरळच्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाहीत. असे असताना नवीन उपनगरीय सेवेत वाढ करण्याऐवजी मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यावेळी पनवेलमार्गे मुंबईत लवकर पोहचण्याची शक्यता असताना त्या मार्गावर उपनगरीय लोकल किंवा शटल सेवा सुरू करण्यासदेखील मान्यता देत नाही. असे असताना रेल्वे प्रशासनाला बदलापूरच्या पुढे लोकसंख्या …

Read More »

खेळा, फिट राहा, यशस्वी व्हा!

खेळांचा हंगाम आता भरात येऊ लागला आहे. जिकडे-तिकडे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा रंगताना दिसत असून, त्यामध्ये असंख्य खेळाडू सहभाग घेत आपले कौशल्य दाखवत आहेत. खेळ म्हणजे केवळ मनोरंजन व शारीरिक कसरत ही संज्ञा काळाच्या ओघात बदलली. या क्षेत्रातही करिअर होत असल्याने मुलांसह त्यांच्या पालकांचा ओढा विविध खेळांकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. …

Read More »