Breaking News

महत्वाच्या बातम्या

दुचाकीची रुग्णवाहिकेला धडक; हेदवलीजवळ अपघातात एक जखमी

सुधागड : रामप्रहर वृत्त  पाली-खोपोली राज्य महामार्गावरील हेदवली गावानजीक असलेल्या टॉपर कंपनीजवळ मंगळवारी (दि. 3)संध्याकाळी रुग्णवाहिका आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका (एमएच-04, जीपी-504) पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती, तर दशरथ दत्तू पवार …

Read More »

मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी फरार रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोळी येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून आरोपी मुख्याध्यापक फरार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुडकोळी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी …

Read More »

पेब किल्ल्यावरून घसरून ट्रेकर दरीत

सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले जीवदान; सह्याद्री रेस्क्यू टीमची कामगिरी कर्जत : बातमीदार विकटगड (पेब) हा किल्ला सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर भ्रमंतीला ट्रेकर्सची कायम पसंती असते. मंगळवारी पुण्याहून पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा पाय घसरून तो सुमारे 350 फूट खोल दरीत घरंगळत गेला, मात्र सह्याद्री रेस्क्यू …

Read More »

रायगड वाहतूक पोलीस दलाला मिळाले बळ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात चार इंटर सेफ्टर व्हेईकल दाखल झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविणार्‍या बेजबाबदार चालकांना आता स्पीड गनच्या कॅमेरात टिपले जाणार आहे, तसेच वाहनाच्या मालकाकडून दंड वसूल केला जाईल. महामार्गावरील सुसाट वाहन चालविणार्‍यावर पोलिसांचे लक्ष राहावे यासाठी राज्य सरकारने राज्यात 92 …

Read More »

मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही!

पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका मुंबई : प्रतिनिधी माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत, मात्र आता स्वत: पंकजा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, …

Read More »

‘एक देश, एक रेशन कार्ड’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात ’वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा रंगलेली असताना आता ’एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या 1 जूनपासून देशात ही मोहीम राबविणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार …

Read More »

एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुनरूच्चार पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कष्ट घेत आहेत आणि लोकहितासाठी काम करणार्‍या भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. नव्या राजकीय …

Read More »

ओवे येथे आजपासून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर ओवे गावातील हावमा एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 8 डिसेंबरदरम्यान आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने खेळाडू आणि दर्शकांना पर्वणी उपलब्ध झाली आहे. आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धेमधील विजेत्या संघास दोन …

Read More »

गौरव पुरस्कारांनी श्रीराम महाजन सन्मानित

नवी मुंबई ः वार्ताहर मुंबई येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2019 चेंबूर कर्नाटका हायस्कूलचे कलाशिक्षक श्रीराम साहेबराव महाजन यांना देण्यात आला. परळच्या दामोदर सभागृहांमध्ये झालेल्या कार्यक्रमात श्रीराम महाजन यांच्यासह महाराष्ट्रातून 36 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेलमधील विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त  पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे नुकतीच पनवेल तालुक्यातील वळवली गावातील जिल्हा परिषद शाळेतील 167  तसेच कोलवाडी येथील संजयगांधी स्मारक हायस्कूलमधील 137 मुलांची अशी एकूण 305 मुलांची मोफत नेत्र तपासणी केली. यापैकी 40 मुलांना पुढील तपासणीसाठी पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्टमध्ये बोलविण्यात आले आहे. ग्रामीण तसेच …

Read More »