रेवदंडा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासदांसाठी रेवदंड्यातील डॉ. विजय वरसोलक यांच्या रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्था व रेवदंडा-चौल डॉक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात रक्तशर्करा तपासणी, युरिक अॅसिड व हिमोग्लोबीन तपासणी, डायबिटीस तपासणी व उपचार करण्यात आले. हे शिबिर यशस्वी …
Read More »माणगावमध्ये महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन
माणगाव : प्रतिनिधी येथील डीजीटी महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 16) विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात अॅड. कविता ढाकवळ यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या सुरक्षेसाठी असणारे कायदे, आपण कायद्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो, कायद्याच्या वापरामुळे आपल्याला कशा प्रकारे संरक्षण मिळू शकते याविषयी अॅड. कविता ढाकवळ यांनी उपस्थितांना …
Read More »म्हसळा भाजपने केला राहुल गांधींचा निषेध
म्हसळा : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा म्हसळा तालुका भाजपतर्फे निषेध करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी या वेळी केली. म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या …
Read More »वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेबद्दल राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाला पुरस्कार
कर्जत : प्रतिनिधी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ’एक विद्याथी एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने जून 2019मध्ये वृक्षारोपण सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकूण अडीच हजार रोपांची लागवड केली आणि त्यांचे संवर्धनही सुरू आहे. या …
Read More »रायगडमधील बँक घोटाळा
पश्चिम महाराष्ट्रात वसंतदादा, राजाराम बापू यांच्यासारख्या नेत्यांनी सहकार चळवळ उभी करून त्यातून नेतृत्व उभे करून राज्याचे नेतृत्व केले. कोकणात मात्र सहकार रूजला नाही हे कटू सत्य आहे. गोरेगाव अर्बन, रोहा अर्बन, पेण अर्बन आणि आता कर्नाळा बँक घोटाळ्यावरून हे पुन्हा एकदा दिसून आले. येथील नेत्यांनी सहकारापेक्षा स्वाहाकाराला महत्त्व दिल्याचे दिसून …
Read More »वेस्ट इंडिज संघाला दंड
चेन्नई : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने पहिल्याच वन डेमध्ये विजय मिळवला, मात्र या विजयानंतर त्यांना मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनाच्या 80 टक्के दंड केला आहे. चेन्नईत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात विंडीजने आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या …
Read More »स्मृती मंधानाला आयसीसीचा बहुमान
दुबई : टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणार्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणार्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून आयसीसी वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते. त्यातील एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही संघांत भारताच्या मंधानाचा समावेश करण्यात …
Read More »लाराने घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून, या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावत आहे. लाराने मंगळवारी (दि. 17) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या भेटीबाबत ट्विट करून …
Read More »राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा, मुंबई उपनगरची जेतेदाची हॅट्ट्रिक; महिलांत पुण्याची सरशी
सोलापूर : प्रतिनिधी येथे झालेल्या 56व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात गतविजेत्या ठाण्याला नमवून विजेतेपदावर नाव कोरले, तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधताना पुण्यावर मात केली. हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर रविवारी (दि. 15) सायंकाळी झालेल्या पुरुष गटातील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत …
Read More »टेनिसमध्ये फिक्सिंग; ‘टॉप-30’वर संशय
बर्लिन : वृत्तसंस्था जगातील टॉप-30 खेळाडूंमध्ये समावेश असलेले 135 खेळाडू हे तीन युरोपीय देश आणि अमेरिकेत सुरू असलेल्या मॅच फिक्सिंगच्या चौकशीत संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. टॉप-30मधील एका पुरुष खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा दाट संशय असल्याचे जर्मनीमधील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालातही म्हटले आहे. संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या या खेळाडूने तीन एटीपी टूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper