हर्षल शर्माची दुहेरी कामगिरी खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)चा विद्यार्थी हर्षल हेमंत शर्मा (इयत्ता आठवी) याने गोळाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. सीबीएसई बोर्डाची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथील संजय घोडावत …
Read More »कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटलांनी फसवणूक केली
महाड : प्रतिनिधी आर्थिक संकटात सापडलेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनी बुधवारी (दि. 13) बँकेच्या महाड शाखेत जाऊन अधिकार्यांना घेराव घातला आणि आपल्या ठेवी परत देण्याची मागणी केली. जर ठेवी परत दिल्या नाहीत, तर सर्व ग्राहकांना एकत्र करून बँकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. ‘आम्ही बँकेच्या सप्टेंबरमधील वार्षिक …
Read More »खालापूरनंतर मुरूडमध्ये बिबट्या
नांदगाव समुद्रकिनार्यावर ठसे; वनविभागाकडून पाहणी मुरूड : प्रतिनिधी खालापूरनंतर आता मुरूड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनार्यावर बिबट्या येऊन गेल्याच्या पाऊलखुणा नागरिकांना दिसून आल्या आहेत. वनविभागानेही त्यास दुजोरा दिला आहे. फणसाड अभयारण्यातील एक बिबट्या अन्नाच्या शोधार्थ बुधवारी रात्री नांदगाव समुद्रकिनार्यावर आला होता. त्याच्या पावलांचे ठसे गावकर्यांना वाळूत दिसले. याची खबर ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल प्रशांत …
Read More »सात वर्षांच्या मुलीने साकारले बालदिनाचे डुडल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून गुरुवारी (दि. 14) साजरा करण्यात आला. या बालदिनानिमित्त गुगलनेही डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे डुडल सात वर्षांच्या विद्यार्थिनीने साकारले. गुगलकडून बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि त्यातून एक बेस्ट डुडल गुगलच्या …
Read More »गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन
नाशिक : प्रतिनिधी अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ गुरुवारी (दि. 14) सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत …
Read More »महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचे नितीश कुमार यांच्याकडून समर्थन
पाटणा : वृत्तसंस्था कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल, तर कुणीही काय केले असते, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी समर्थन केले आहे. पाटणातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर …
Read More »लग्नजल्लोषात हवेत गोळीबार; नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू
उजैन : वृत्तसंस्था उत्तर भारतात काही लग्न सोहळ्यांमध्ये हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणार्या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला. उज्जैनपासून 30 किलोमीटर …
Read More »यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर
मुंबई : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे …
Read More »आता मिशन चांद्रयान-3
नोव्हेंबर 2020चे लक्ष्य; ‘इस्रो’कडून तयारी सुरू बंगळुरू : वृत्तसंस्था पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठीशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करणार …
Read More »भाईदास पाटील यांना ‘पीएचडी’
खोपोली ़: प्रतिनिधी जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोगलवाडी (खोपोली) येथील हिंदी विद्यालयाचे हिंदी भाषा शिक्षक भाईदास पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली. त्यासाठी भाईदास पाटील यांना केएमसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ सादिका अस्लम नवाब यांनी मार्गदर्शन केले. पाटील यांनी ‘21 व्या शतकातील मराठी व हिंदी भाषेतील कवियत्री यांचे योगदान व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper