Breaking News

महत्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीसाठी स्थर, फिरते संरक्षण पथक

उरण : वार्ताहर विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी उरण, उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे देखरेखीखाली स्थिर संरक्षण पथक व फिरते संरक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊन पुढे मतदान होईपर्यंत राहणार आहे. प्रत्येक पथकात तीन पोलीस कर्मचारी, तीन इतर कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांची नेमणूक करण्यात …

Read More »

कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 877 मतदार असून या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगल कार्यालयात …

Read More »

‘कर्नाळा’वर निर्बंध हवेत?

पनवेल परिसरातील पनवेल, खारघर, तळोजा, नवीन पनवेल अशा ठिकाणी शाखा असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारांत आर्थिक अनियमितता असल्याची शंका आहे. पै न् पै गोळा करून आयुष्यभराची कमावलेली पुंजी लोकांनी अत्यंत विश्वासाने बँकेत ठेवली, पण आता दिवाळीच्या तोंडावर आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याने सभासदांची पाचावर धारणा बसली आहे. ग्राहकांच्या तक्रारींच्या …

Read More »

पाठ्यपुस्तकातील हिरकणी मोठ्या पडद्यावर

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आहे. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक चित्रपटांची धूम आहे. एकापाठोपाठ एक या पठडीतीले चित्रपट येत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिवराय, संभाजी, कोंडाजी फर्जंद यांच्यानंतर आता हिरकणीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येत आहे. हिरकणीची गोष्ट महाराष्ट्राला नवी नाही. सर्व जण शाळेत असताना मराठीच्या …

Read More »

रायगडातील राजकीय जागर

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाल्याने या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील वातावरणही ढवळून निघत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर या रणसंग्रामाला वेग येईल. तत्पूर्वी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा घेतलेला धांडोळा… रायगड जिल्ह्याचे राजकारण राज्यात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी …

Read More »

कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, याच शक्तीच्या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने तिसर्‍यांदा विधानसभेत पाठवू या, अशी साद पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी घातली. त्या कळंबोली येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. पुन्हा आणू …

Read More »

पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज भाजपत मेगाभरती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा रविवारी (दि. 29) भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल आणि मोहोपाडा येथे ‘मेगाभरती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपच्या माध्यमातून केंद्रात व राज्यात होणारी विकासकामे, तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही!

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांची ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार, भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 28) पनवेल येथे दिली. कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक …

Read More »

भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस शुक्रवारी  उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अमित सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, …

Read More »

वावंजे विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयतच्या सर्व शाळा आणि महाविद्याल यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. वावंजे येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये जयंती सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग …

Read More »