Breaking News

महत्वाच्या बातम्या

मोकळ्या भूखंडावर गृहप्रकल्प

पनवेल ः रामप्रहर वृत्त एका वर्षांत दोन लाख घरे बांधण्याचा निर्णय जाहीर करणार्‍या सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण तालुक्यातील संपादित मोकळ्या जमिनीवर जास्तीत जास्त गृहप्रकल्प व औद्योगिक वसाहती उभारणार असल्याचे सांगितले आहे. सिडकोने गेल्या 50 वर्षांत या संपादित जमिनी संरक्षित न केल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. …

Read More »

पनवेल रेल्वेस्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम; कफ व सेंट झेवियर महाविद्यालयाचा उपक्रम

पनवेल ः वार्ताहर सिटिझन्स युनिटी फोरम, पनवेल व सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 22) पनवेल रेल्वेस्टेशन नजीकच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या परिसरामध्ये लोकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात होत असतो. यामध्ये जवळपास 50 ते 60 विद्यार्थी …

Read More »

पनवेल रेल्वेस्टेशनवर वन रूपी क्लिनिक

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वेस्टेशनवर नवीन पनवेल बाजूला प्रवाशांसाठी  वन रूपी क्लिनिक नुकतेच  सुरू करण्यात आले आहे.  विषारी सापांचाही तेथे संचार सुरू असल्याने तेथील डॉक्टर, परिचारिका आणि येणार्‍या रुग्णांच्यात भीतीचे वातावरण आहे. जागा चुकीची निवडल्याने या ठिकाणी येणार्‍या रुग्णांची संख्या कमी असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. पनवेल रेल्वेस्टेशनवर रोज लाखो …

Read More »

महेश बालदी यांना पसंती; उरण विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील पोतदार सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी …

Read More »

सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंचे सुयश; तिघांची राष्ट्रीय स्तरावर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाटकमधील निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या साऊथ झोन सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धा 2019-20मध्ये पनवेल महापालिका हद्दीतील चार खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके पटकाविली. 14 वर्षांखालील मुलींच्या 51 किलोखालील गटात …

Read More »

तलवारबाजी स्पर्धेत ‘आरटीपीएस’ला पदके

खारघर : रामप्रहर वृत्त नंदूरबार फेन्सिग असोसिएशनतर्फे पाथ्री येथील के. डी. गावित एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आयोजित कॅडेट महाराष्ट्र राज्य तलवारबाजी चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. ‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपली चमकदार कामगिरी स्पर्धेत दाखविली. यामध्ये सांघिक प्रकारात …

Read More »

टी-20 मालिका बरोबरीत

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतावर नऊ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले.  तीन टी-20 सामन्यांची ही मालिका अखेरीस 1-1 अशा बरोबरीत सुटली आहे. भारताने विजयासाठी दिलेले 135 धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज …

Read More »

पनवेल विधानसभा मतदारसंघात आजपासून भाजपच्या बैठकांचा धडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणूक जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने पनवेल मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतली असून, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागवार बैठकांचे आयोजन सोमवार (दि. 23)पासून करण्यात आले आहे. भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यानुसार सोमवारी (दि. 23) …

Read More »

रायगडात पावणेतीन लाख मतदार वाढले

अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये 22 लाख 65 हजार 478 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014च्या तुलनेत जिल्ह्यात दोन लाख 89 हजार 206 मतदार वाढले आहेत, अशी महिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 22) येथे दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर …

Read More »

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 22) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, …

Read More »