Breaking News

महत्वाच्या बातम्या

वसुंधरेच्या संवर्धनासाठी सारे एकवटले

ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवरील परिणामावर सुधागडात परिसंवाद पाली ः वार्ताहर हवामान व तापमानातील होणारे बदल सजीवसृष्टीस हानिकारक ठरू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज आहे. याकरिता सामाजिक संघटना पुढे येऊन काम करीत आहेत. ग्रेटा थनबर्ग हिच्या फ्रायडे फॉर फ्युचर या चळवळीत सहभाग म्हणून ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवर …

Read More »

मारुती देवरेंचे नागोठणे भाजपकडून अभिनंदन

नागोठणे : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नागोठणेसह संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात असून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर तसेच रविशेठ पाटील यांचे हात निश्चितच आणखी …

Read More »

जावळीतील ग्रामस्थ भाजपत

पेण ः प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पूर्व भागातील वरसई विभागातील जावळी येथील ग्रामस्थांनी रविवारी (दि. 22) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश पाटील, सीताराम पाटील, लहू आंबे्र, रोहिदास जाधव, सुरेश बने, …

Read More »

सीकेटी विद्यालयात कराटे स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त जपान कराटे सोतोकाई 24वी राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 22) नवीन पनवेल येथील सीकेटी हायस्कूलमध्ये झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप नेते एकनाथ भोपी, पांडुशेठ केणी, आत्माराम पाटील, …

Read More »

डॉ. कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल पनवेल विद्यालयात जयंती उत्सव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती रविवारी (दि. 22) न्यू इंग्लिश स्कूल, मार्केट यार्ड, पनवेल या विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी विद्यालयाचे व्हाईस चेअरमन पनवेल पालिका सभागृह नेते …

Read More »

रायगडच्या दोघांची वॉटरपोलो संघात निवड

पाली : प्रतिनिधी एशियन एज ग्रुप भारतीय वॉटरपोलो संघात रिलायन्स नागोठणे येथील राज विनायक पाटील व वेदांत उद्धव कुथे यांची निवड झाली आहे. खेडेगावात वास्तव्यास असलेल्या या खेळाडूंनी जलतरण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. त्यांना प्रशिक्षक दत्ता तरे यांचे मार्गदर्शन लाभले.  रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, …

Read More »

म्हात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

उरण : प्रतिनिधी आयईएस जवाहरलाल नेहरू विद्यालयात आयोजित  तालुकास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. त्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत म्हात्रे विद्यालयाची समीक्षा गावंड हिने थाळीफेकमध्ये प्रथम व गोळाफेकमध्ये द्वितीय, मन म्हात्रे याने थाळीफेकमध्ये प्रथम, ॠतिक पाटीलने उंच उडीत …

Read More »

नरेंद्र मोदींनी मने जिंकली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिका दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचे दर्शन ह्यूस्टनमध्ये घडले. विमानतळावर मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचे मोदींच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचलले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींची ऊर्जा क्षेत्रातील सीईओंसोबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी …

Read More »

दीपक पुनियालाही रौप्यपदकावर समाधान

नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था अमित पंघलपाठोपाठ भारताचा नवोदित कुस्तीपटू दीपक पुनिया यालाही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 86 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दीपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. पहिल्याच अजिंक्यपद स्पर्धेत दीपकने रौप्यपदकाची …

Read More »

कळंबोलीतील कॅप्टन बारवर पोलिसांचा पुन्हा छापा; चार बारबालांसह 57 जण ताब्यात

पनवेल : बातमीदार   कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅप्टन बारवर पोलिसांनी रविवारी (दि. 22) मध्यरात्री छापा मारून चार बारबालांसह मालक, व्यवस्थापक, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 57 जणांना ताब्यात घेतले आहे. कळंबोली पोलिसांनी मध्यरात्री 2:15 वाजता ही कारवाई करण्यात आली. टाकण्यात आलेल्या या धाडीत मालक, व्यवस्थापक, कॅशियर, दोन वेटर आणि …

Read More »