रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 4) सलग दुसर्या दिवशी झोडपून काढले. या पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, महाड आणि नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरले होते, तर अलिबाग, रोहा शहरांतील सखल भागात घरांमध्ये पाणी घुसले. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला नुकताच तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी खासदार लोकनते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रभातचा बुधवारी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष …
Read More »आगामी विधानसभा रणसंग्राम तयारी
जिल्हाधिकार्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा अलिबाग : जिमाका आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 4) जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहाय्यक निवडणूक अधिकारी, तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी वैशाली माने (निवडणूक), …
Read More »फसवणूक झालेल्या मालकांना वाहने परत
पनवेल पोलिसांची कामगिरी; 60 गाड्या सुपूर्द पनवेल : वार्ताहर गाडी व्यवसायाला लावतो असे सांगून वाहनमालकांची काही जणांनी फसवणूक केली होती. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक बनवून फसवणूक करणार्या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून तीन कोटी सात लाख 80 हजार रुपये किमतीच्या एकूण …
Read More »विजेच्या धक्क्याने तरुण मृत्युमुखी
कळंबोली : प्रतिनिधी तोंडरे येथे विजेचा शॉक लागून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव सिंग राजपूत असे तरुणाचे नाव असून तो तोंडरे गावात वास्तव्यास होता. वैभव बुधवारी (दि. 4) सकाळी 8च्या सुमारास आपल्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उघडण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी मीटरची वायर ब्रेक झाली …
Read More »पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट
19 जण ठार, अनेक जखमी गुरुदासपूर (पंजाब) ः वृत्तसंस्था पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, दोन इमारतीत 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये …
Read More »रायगड जिल्हा मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी
ऑनलाईन फॉर्म भरण्यास 10 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा होमगार्ड अंतर्गत पथक, उपपथकामधील पुरुष, महिला होमगार्ड सदस्य नोंदणी 16 व 17 सप्टेंबर 2019 रोजी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे सकाळी 7.00 पासून घेण्यात येणार आहे. नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी सप्टेंबरपर्यंत (हीींिीं://वपूरपक्षूेींळीरींरीर.ळप/हसारहर/श्रेसळप1हिि) या संकेतस्थळावर जाऊन कॠड एछठजङङचएछढ मधील …
Read More »महाडमध्ये पाणी शिरले, मुरूडमध्येही कोसळधार
महाड : प्रतिनिधी पंधरा दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर महाड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर गेल्या चार दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या तीन प्रमुख नद्यांतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरातील सखल भागांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे …
Read More »पालीत बल्लाळेश्वर जन्मोत्सव सोहळा; भाविकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरात सोमवारी (दि. 2) गणेश जन्मोत्सव सोहळा धार्मिक व उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी जन्मोत्सव सोहळ्याचा धार्मिक विधी सुयोग कोनकर, सुहास आपटे, चिन्मय कोनकर, हेरंब परब, अभिजित मराठे यांनी केला. मंदिराच्या गाभार्यात बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गणरायाच्या जयघोषाने …
Read More »निवडणुकांच्या निकालासाठी उमेदवारांची आंघोळ
कर्जत तहसील व निवडणूक आयोगाच्या नियोजनाचा फटका कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आले. यासाठी नेहमीप्रमाणे कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. मात्र तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे निकाल ऐेकण्यासाठी आलेल्या उमेदवारांसह सगळ्यांची कर्जत तहसील कार्यालयात चिंब भिजून दैना झाली. गेल्या काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper